घरमुंबईमुंबईकरांनो ! आता अंधाराची चिंता नसावी, खारघर-विक्रोळीदरम्यान वीजवाहिनीचे काम पूर्ण

मुंबईकरांनो ! आता अंधाराची चिंता नसावी, खारघर-विक्रोळीदरम्यान वीजवाहिनीचे काम पूर्ण

Subscribe

मुंबईत गेल्या काही महिन्यात शहराला वीजपुरवठा करणाऱ्या पारेषण वाहिन्यांची क्षमता संपत आली होती. ज्यामुळे मुंबईकरांना काळोखाचा सामना करावा लागू नये, यासाठी तत्काळ त्यावर उपाय म्हणून पारेषण वाहिन्यांचे काम सुरू करण्यात आले होते.

मुंबई : मुंबईत गेल्या काही महिन्यात शहराला वीजपुरवठा करणाऱ्या पारेषण वाहिन्यांची क्षमता संपत आली होती. ज्यामुळे मुंबईकरांना काळोखाचा सामना करावा लागू नये, यासाठी तत्काळ त्यावर उपाय म्हणून पारेषण वाहिन्यांचे काम सुरू करण्यात आले होते. खारघर-विक्रोळी दरम्यान हे काम करण्यात आले. ज्यामुळे आता मुंबईकरांवरील ब्लॅकआऊटचे संकट मिटले आहे. खारघर-विक्रोळी दरम्यान करण्यात आलेल्या पारेषणच्या कामामुळे आता मुंबईकरांना आणखी एक हजार मेगावॅट वीज उपलब्ध होणार आहे. तसेच, वीजेची वाढती मागणी लक्षात घेता महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार अदानी एनर्जी सोल्युशनने खारघर-विक्रोळीदरम्यान तब्बल 75 सर्किट किलोमीटर लांबीची 400 केव्हीची उच्चदाब वीजवाहिनी उभारली असून ती आज कार्यन्वित केली आहे. (Mumbaikars! No need to worry about darkness now, the work of power line between Kharghar-Vikhroli is complete)

हेही वाचा – गणेशोत्सवात कोकणातही कोटींची उलाढाल; चाकरमान्यांचा ‘लोकल फॉर व्होकल’वर भर

- Advertisement -

सध्या मुंबईत कमाल चार हजार मेगावॅट वीजेची मागणी आहे. ती पूर्ण करण्यासाठी टाटा पॉवरच्या ट्रॉम्बे येथील वीज केंद्रातून 1100 मेगावॅट, अदानीच्या डहाणू वीज केंद्रातून 500 मेगावॅटपर्यंत वीज उपलब्ध होते, तर उर्वरित वीज राज्याच्या ग्राडमधून घेतली जाते, तर राज्याच्या ग्राडमधून मुंबईत वीज वाहून आणण्यासाठी टाटा पॉवरची खोपोली-कळवा-सालशेत आणि महापारेषणच्या वीजवाहिन्या उपलब्ध आहेत. त्याची क्षमता 3 हजार मेगावॅटच्या घरात आहे.

परंतु, मुंबईजवळ असलेल्या वीज केंद्रात बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित झाल्यास राज्यात वीज उपलब्ध असूनही 2800-3000 मेगावॅटपेक्षा जास्त वीज वाहून आणता येत नाही. त्यामुळेच 12 ऑक्टोबर 2020 रोजी मुंबईत ब्लॅकआऊट झाला होता. ज्यानंतर अनेकदा मुंबईकरांना ब्लॅकआऊटचा सामना करावा लागला होता. राज्यात पुरेशी वीज उपलब्ध असूनही केवळ पुरेशा वीजवाहिन्या नसल्याने ती मुंबईत वाहून आणता आली नव्हती.

- Advertisement -

ज्यामुळे याबाबतची गंभीर दखल घेत वीज आयोगाने खारघर-विक्रोळीदरम्यान 400 केव्ही आणि 220 केव्हीची उच्चदाब वीजवाहिनी आणि जीआयएस सबस्टेशन विक्रोळी येथे उभारण्याचे काम अदानी एनर्जी सोल्युशनला दिले होते. त्यानुसार त्यांनी सदरची वीजवाहिनी उभारून आज कार्यान्वित केली आहे. त्यामुळे आणीबाणीच्या वेळी राज्याच्या ग्रीडमधून एकूण 4000 मेगावॅट वीज आणणे शक्य होणार असून आता मुंबईवरील अंधाराची घटना टाळता येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -