घरताज्या घडामोडीचक्रीवादळाच्या तडाख्यानंतर लसीकरणास पालिका सज्ज, मुंबईतील काही केंद्रांवर लसीकरण पुन्हा सुरू होणार

चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर लसीकरणास पालिका सज्ज, मुंबईतील काही केंद्रांवर लसीकरण पुन्हा सुरू होणार

Subscribe

१८ व १९ मे रोजी मुंबईत लसीकरण सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना तौत्के चक्रीवादळाचे मोठे संकट मुंबईत धडकल्याने मुंबई महापालिकेने १७ मे रोजी लसीकरण केंद्र बंद ठेवली होती. तसेच, १४ ते १६ मे २०२१ या कालावधीतही लसीकरण स्थगित ठेवण्यात आले होते. मात्र सोमवारी रात्री ८ नंतर चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकल्याने आता पालिकेने पुन्हा एकदा लसीकरण मोहीम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मंगळवारपासून मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रे सुरु करण्यात येत आहेत परंतु लसीकरण केंद्र बंद राहण्याची शक्यता पालिकेकडून वर्तवण्यात आली आहे.

दि. १८ व १९ मे रोजी मुंबईत कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र काही लसीकरण केंद्र बंद राहण्याची शक्यताही पालिकेने वर्तवली आहे. मुंबई महापालिकेने, कोविड-१९ प्रतिबंध लसीकरण मोहिम अंतर्गत उपलब्ध लस साठ्याची मर्यादा लक्षात घेता आणि मोहिमेतील प्राधान्य लक्षात घेऊन लसीकरणाचे दैनंदिन नियोजन केले आहे. १४ ते १६ मे या कालावधीत लसीकरण स्थगित करण्यात आले होते. तर १७ मे रोजी चक्रवादळामुळे आणि मुंबईकरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लसीकरण बंद ठेवले होते.

- Advertisement -

मात्र १८ व १९ मे रोजी मुंबईत लसीकरण सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र वादळासह पावसाने प्रभावित झालेली काही लसीकरण केंद्रे १८ मे बंद राहणार आहेत. कोविशिल्ड लस देताना, केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक सुचनांनुसार, कोविशिल्डच्या पहिल्या मात्रेनंतर किमान १२ ते १६ आठवडे (किमान ८४ दिवस) पूर्ण केलेल्यांनाच दुसरी मात्रा देण्यात येणार आहे. त्यामुळे ६० वर्ष वयोगटातील नागरिक २४ मे २०२१ नंतर दुसऱया मात्रेसाठी पात्र राहतील.

याअनुषंगाने १८ मे आणि १९ मे या दोन्ही दिवशी कोविशिल्डच्या पहिल्या मात्रेसाठी ६० वर्ष व त्यावरील वयोगटातील नागरिकांना लसीकरण केंद्रावर थेट (वॉक इन) जाऊन लस घेता येईल, असे पालिकेने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -