घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: दिलासा! राज्यात आज नव्या रुग्णांची संख्या ३० हजारांपेक्षा खाली,...

Maharashtra Corona Update: दिलासा! राज्यात आज नव्या रुग्णांची संख्या ३० हजारांपेक्षा खाली, तर ५१६ मृत्यू

Subscribe

राज्यात लॉकडाऊनचा परिणाम आता दिसायला लागला असून गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा आलोख खाली घसरत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात आजही नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात तब्बल ४८ हजार २११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर आज नवीन २६ हजार ६१६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान आज ५१६ कोरोना रुग्णांची मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

त्यामुळे आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५४ लाख ०५ हजार ०६८ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ८२ हजार ४८६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ४ लाख ४५ हजार ४९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज नोंद झालेल्या एकूण ५१६ मृत्यूंपैकी २८९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २२७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ४८४ ने वाढली आहे.

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी १३ लाख ३८ हजार ४०७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५४ लाख ०५ हजार ०६८ (१७.२५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३३ लाख ७४ हजार २५७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८ हजार १०२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -