घरमुंबईघरावरून झालेल्या भांडणातून पत्नीची हत्या

घरावरून झालेल्या भांडणातून पत्नीची हत्या

Subscribe

मोबाईलसह घरावरून सतत होणार्‍या भांडणाला कंटाळून एका तरुणाने त्याच्याच पत्नीची हत्या केल्याची घटना घडली. हत्येनंतर पळून गेलेल्या आरोपी पती आरिफ कले खान (24) याला मध्य प्रदेशातून जे. जे. मार्ग पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. त्याच्यावर त्याची पत्नी निशा हिची हत्या केल्याचा आरोप आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने 28 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे एसीपी अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले. आरिफ हा त्याची पत्नी निशासोबत बेग मोहम्मद चाळ परिसरात राहत होता.

16 नोव्हेंबरला इमारत क्रमांक 1 जवळ निशाचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. चौकशीत निशाची हत्या झाल्याचे उघडकीस आले होते. या हत्येनंतर तिचा पती आरिफ खान हा पळून गेला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध जे. जे. मार्ग पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरू असताना आरिफ हा मध्य प्रदेशात पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर एसीपी अविनाश धर्माधिकारी यांच्या पथकातील इक्बाल अवळकर, खान व अन्य पोलीस पथकाने मध्य प्रदेशातील बडोदा व पतोडा परिसरात त्याचा शोध सुरू केला होता. अखेर त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले, चौकशीत त्यानेच निशाची हत्या केल्याची कबुली दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -