घरमुंबईरातोरात बोलवले अन् दिशाभूल करत राजभवनापर्यंत नेले

रातोरात बोलवले अन् दिशाभूल करत राजभवनापर्यंत नेले

Subscribe

परतलेल्या आमदारांनी केले भाष्य

शिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील आमदार राजेंद्र शिंगणे हे अजित पवार यांच्यासमवेत शपथविधी कार्यक्रमास उपस्थित होते. राजभवनापर्यंत पोहोचेपर्यंत आपणास असा काही कार्यक्रम आहे याची कल्पनाही नव्हती, असे त्यांनी सांगितले. अजित पवार यांनी आपली दिशाभूल करत राजभवनापर्यंत नेले, असे सांगत शिंगणे यांनी रात्रीच्या वेळी झालेल्या घडामोडींची पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. त्यांच्यासह बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा यांनीही या माहितीला पुष्टी दिली.

अजित पवारांबरोबर शपथविधीसाठी १० ते ११ सदस्य गेले होते. यासंदर्भातील माहिती शरद पवार यांनीच देत सदस्यांना अनुभव कथन करण्याची सूचना पत्रकार परिषदेत केली. यावेळी राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले की, रात्री अचानक अजितदादांचा मला फोन आला. त्यानंतर धनंजय मुंडे यांचाही संदेश मिळाला. पक्षाची महत्वाची बैठक असल्याचे सांगून मला रात्रीच मुंडे यांच्या निवासस्थानी बोलविण्यात आले. तेथून आम्हा आठ ते दहा आमदारांना वाहनात बसवून बैठकीला तातडीने जायचे असल्याची माहिती देण्यात आली. हे वाहन राजभवनात जाईपर्यंत आम्हाला कुणालाच पुढे काय होणार याची कल्पना नव्हती. राजभवनात पोहोचल्यावर मात्र पुसटशी कल्पना आली. काही क्षणातच देवेंद्र फडणवीस आले आणि त्यानंतर ताबडतोबीने शपथविधी झाला. राजभवनाबाहेर पडल्यावर आम्ही थेट पवारसाहेबांकडे गेलो. आम्ही त्यावेळी अत्यंत अस्वस्थ होतो. शपथविधी आम्ही पवारांसाहेबांसोबतच आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -