घरमुंबईआता Nair Hospital मधला गंभीर प्रकार, कोरोनाबाधिताचे नमुने नातेवाईकच नेतात लॅबमध्ये!

आता Nair Hospital मधला गंभीर प्रकार, कोरोनाबाधिताचे नमुने नातेवाईकच नेतात लॅबमध्ये!

Subscribe

कोरोनाबाधित रुग्णासोबत रुग्णालयात नातेवाईकांना प्रवेश दिला जात नाही. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक होण्याची शक्यता लक्षात घेऊन नातेवाईकांना रुग्णालयात प्रवेश नाकारला जात असला तरी नायर रुग्णालयात बाधित रुग्णाच्या सोबत असलेल्या नातेवाईकांकडेच रक्त चाचणीचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जात आहेत. त्यामुळे रुग्णासोबत असलेल्या नातेवाईकाला बाधा होण्याची दाट शक्यता आहे. एकीकडे मुंबईत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याबद्दल मुंबई प्रशासनावर टीका केली जात असताना पालिका रुग्णालयात एकापाठोपाठ एक गंभीर प्रकरणं समोर येत आहेत. नुकतंच सायन रुग्णालयात मृतदेह भलत्यालाच दिल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता पालिकेच्या अजून एका रुग्णालयातला प्रकार समोर आला आहे.

तपासणीसाठी नमुने गिरगावच्या लॅबमध्ये

कस्तुरबा रुग्णालयानंतर महापालिकेने शीव व नायर रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार कक्ष सुरू केले. मात्र नायर रुग्णालयात सुरू केलेल्या कोविड कक्षात दाखल केलेल्या रुग्णाची इतर वैद्यकीय तपासणी अहवाल तयार रक्ताचे नमुने गिरगाव येथील लॅबमध्ये पाठवले जातात. हे नमुने रुग्णालयाने परस्पर लॅबला पाठवणे आवश्यक आहे. परंतु रुग्णालयातील डॉक्टर हेच रक्ताचे नमुने नातेवाईकांच्या हाती ठेवून त्यांना त्या लॅबमध्ये पाठवत आहे.

- Advertisement -

एका बाजूला कोविड बाधित रुग्णाच्या संपर्कात कुणी जाणार नाही याची काळजी घेत असल्याचे चित्र रुग्णालय व्यवस्थापन, प्रशासन आणि सरकार रंगवत आहे. दुसरीकडे रुग्णाच्या नातेवाईकांकडे रक्त नमुने तपासणीला पाठवले जात आहे. हे रक्त नमुने कोविड बाधित रुग्णाचे असल्याने ते हाताळताना नातेवाईकाला संसर्ग होण्याची दाट शक्यता असते.

नमुने घरी घेऊन जाण्याचा सल्ला!

मागील आठवड्यात एका महिला रुग्णाच्या मुलाला असेच रक्ताच्या नामुन्याच्या बॉटल्स हाती देऊन गिरगाव मधील लॅब मधून तपासणी करून आणण्यास सांगितले. बाधित रुग्णाला मधुमेहासह अन्य प्रकारचे काही आजार असल्यास ते पाहण्यासाठी इतर रक्त तपासणी केली जाते. त्या मुळे तो मुलगा गिरगावला लॅबमध्ये पोहोचला. पण रविवार असल्याने लॅब बंद होती. त्यामुळे त्यांनी याची कल्पना डॉक्टर व नर्स यांना दिली. त्यावर त्यांनी हे नमुने घरी घेऊन जा आणि उद्या तपासणीला न्या अशा सूचना केल्या. रक्तामुळे हा संसर्ग होत नसला तरी याचे नमुने कोविड रुग्णालयातील नर्स व इतर कर्मचाऱ्यांनी हाताळत ते नातेवाईकांच्या हाती सोपवल्याने त्या देवाण घेवाणीतून हा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे लॅबमध्ये रक्त नमुने नेण्यास नातेवाईकांना सांगितले जाऊच नये अशी मागणी होत आहे. पण याकडे रुग्णालय प्रशासनाचा दुर्लक्ष होत असल्याचा रुगणांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.


हेही वाचा – होय, Sion Hospital मध्ये ‘तो’ प्रकार घडला होता; आयुक्तांची कबुली!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -