घरमुंबईगृहमंत्र्यांसमोर रश्मी शुक्ला ढसाढसा रडल्या, जितेंद्र आव्हाडांची स्फोटक माहिती

गृहमंत्र्यांसमोर रश्मी शुक्ला ढसाढसा रडल्या, जितेंद्र आव्हाडांची स्फोटक माहिती

Subscribe

रश्मी शुक्लांना फोन टॅप करण्याची घाणेरडी सवय

तत्कालीन अतिरिक्त पोलीस महासंचालक व राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त रशमी शुक्ला या दोन महिन्यांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे आल्या होत्या आणि ढसाढसा रडल्या फोन टॅपींग प्रकरणात माझ्यावर कारवाई करु नका अशी विनंती करत होत्या. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकेर यांच्यासमोरही त्यांनी आपली चूक कबूल केली तसेच चूकीच्या पद्धतीने फोन टॅप केल्यामुळे मुख्यमंत्र्यांसमोर रडल्या होत्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बहिणीकडून चूक झाल्याचे समजून मोठ्या मनाने माफ केले होते. परंतु रश्मी शुक्ला यांनी दोन महिन्यांनंतर विरोधी पक्षांना अहवाल पुरवून कट उभारणाऱ्या रश्मी शुक्ला यांनी कुणाच्याही परवानगीविना फोन टॅप केले हे सिद्ध झाले आहे. अशा अधिकाऱ्यांवर सर्वांनी मिळून एकजूट होऊन कारवाई करण्यात यावी असे मंत्र्यांनी ठरविले आहे. तसेच सर्वांनी एकजूट होऊन या प्रकरणात दुध का दूध आणि पाणी का पाणी केली पाहिजे असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पुढे सांगितले की, काही दिवसांपूर्वी रश्मी शुक्ला भेटल्या होत्या. त्यावेळी त्यांनी म्हटले की, तुम्ही मोबाईलवर संभाषण करु नका, Whatsapp वर बोलू नका आणि जर मला फोन केला तर लँडलाईनवर फोन करा मोबाईलवर फोन करु नका असे रश्मी शुक्ला यांनी म्हटल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले होते. तसेच आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना फोन टॅपींग करण्याची घाणेरडी सवय आहे असे म्हटले आहे. रश्मी शुक्ला यांनी वेगळ्या नावांची परवानगी घेऊन अनेक मंत्र्यांचे फोन टॅप केले आहेत. त्यामुळे त्यांची बदली करण्यात आली होती असा आरोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. यामध्ये अनेक मंत्र्यांचे फोन टॅप झाल्याचा संशय निर्माण झाला आहे. तसेच फोन टॅप प्रकरण हे गंभीर आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारने काही नियम दिले आहेत. राष्ट्रघातक कृत्य, परकीय राष्ट्रातील आत्मघाती संघटनेशी मैत्री, देशातील शांतता भंग करु शकतो तर फोन टॅप करण्यात येतो. मात्र रश्मी शुक्लांनी दिलेली कारणे चुकीची होती. रश्मी शुक्लांनी केलेले फोन टॅपींग हे राईट टू प्रायव्हसीचा भंग असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -