घरमुंबईराष्ट्रवादी महिला काँग्रेसचा राम कदम यांच्याविरोधात पोलीस स्थानकात ठिय्या

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा राम कदम यांच्याविरोधात पोलीस स्थानकात ठिय्या

Subscribe

महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राम कदम यांच्याविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसने आज आघाडी उघडली असून राम कदम यांचे निवासस्थान, पोलीस स्थानकात आंदोलन केले.

दहीहंडीच्या कार्यक्रमात “तुम्हाला आवडलेली मुलगी उचलून आणू”, असे वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चिराग नगर (घाटकोपर) पोलीस स्थानकात राम कदम यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यासाठी नकार दिला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण, मुंबई महिला अध्यक्ष सुरेखा पेडणेकर, मुंबई युवती अध्यक्ष आदिती नलावडे आणि विद्यार्थी अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी पोलीस स्थानकातच ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत पोलीस एफआयआर नोंदवत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाही, असा पवित्रा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

- Advertisement -

भाजप आमदार ‘रावण’ कदम यांच्या फोटोला काळे फासत आणि चपलांचा मारा करत महिलांनी आपला संताप व्यक्त केला. दरम्यान आमदार राम कदम यांच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल करायला तयार नसल्याने राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी आमदार विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राम कदम यांच्या घरावर धडक मोर्चा काढला होता. यावेळी राम कदम यांच्या फोटोला काळे फासून, जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

तर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे आणि पशु व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकार यांना घेराव घालून राम कदम यांनी केलेल्या विकृत वक्तव्याबद्दल त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली.

तत्पूर्वी चित्रा वाघ यांनी राम कदम यांचे विधान हे रामाला शोभणारे नसून रावणाला शोभणारे आहे. परंपरेनुसार विजयादशमीला रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते, मात्र राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -