घरताज्या घडामोडीकोरोनाच्या भीतीने अंत्यसंस्कारासाठी शेजाऱ्यांचा नकार; मृतदेह पालिकेच्या ताब्यात

कोरोनाच्या भीतीने अंत्यसंस्कारासाठी शेजाऱ्यांचा नकार; मृतदेह पालिकेच्या ताब्यात

Subscribe

कोरोनाच्या भीतीने अंत्यसंस्कारासाठी शेजाऱ्यांनी नकार दिल्याची धक्कादायक घटना विक्रोळी येथे घडली आहे.

विक्रोळी येथील पार्क साइट हनुमान नगर येथे राहणाऱ्या एका ४५ वर्षीय व्यक्तीचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. मात्र, त्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या संशयावरुन त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी शेजारी कोणीही पुढे आले नाही. अखेर पालिकेने त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून शेजाऱ्यांनी अंत्यसंस्कारासाठी परवानगी दिली असता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील, अन्यथा पालिकेकडून अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

नेमके काय घडले?

विक्रोळी येथील हनुमान नगर श्री गणेश सोसायटी येथे राहणारे संतोष घोगावले (४२) यांचा नैसर्गिक मृत्यू झाला. ही घटना कळताच शेजाऱ्यांनी त्यांच्या पत्नी आणि लहान मुलाच्या मदतीसाठी जाण्यास नकार दिला. संतोष हे कोरोनाबाधित असल्याच्या संशयावरुन कोणीही त्यांच्या मदतीसाठी पुढे आले नाही. दरम्यान, या परिसरातील लोकप्रतिनिधींनी पालिकेशी संपर्क साधत घडलेला प्रकार सांगितला. सर्वप्रथम पालिकेने नैसर्गिक मृत्यू असल्याकारणाने तुम्हीच अंत्यसंस्कार करा, असे सांगितले. मात्र, शेजारी अंत्यसंस्कारासाठी येण्यास नकार देत असल्याचे त्यांना सांगण्यात आले.

- Advertisement -

दरम्यान, घटनास्थळी पोलीस अधिकारी भोपले आणि बोरसे दाखल झाले. त्यांनी एन विभागाच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर रात्री उशीरा पालिकेची माणसे घटनास्थळी पोहचली. त्यांनी सत्य परिस्थिती जाणून घेतली. मात्र, तरी देखील शेजाऱ्यांनी अंत्यसंस्कारासाठी नकार दिल्याने अखेर महापालिकेने संतोष यांचा मृतदेह आपल्या ताब्यात घेतला. दरम्यान, आज शेजाऱ्यांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी दाखवली तर मृतदेह त्यांच्या पत्नी आणि मुलाचा ताब्यात देण्यात येईल. अन्यथा पालिकेकडून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती देण्यात आली आहे.


हेही वाचा – कोरोनाचे विघ्न; व्हिडिओ कॉलवर घेतले पतीचे अंत्यदर्शन!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -