घरCORONA UPDATECoronavirus: आमदार निवासात क्वॉरंटाइन करण्यात आलेले ९ जण कोरोनाबाधित

Coronavirus: आमदार निवासात क्वॉरंटाइन करण्यात आलेले ९ जण कोरोनाबाधित

Subscribe

कोरोना संशयितांना आमदार निवासात क्वॉरंटाइन करण्यात आलं होतं. त्यापैकी ९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

नागपूरच्या आमदार निवासात क्वॉरंटाइन करण्यात आलेल्या ९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या नऊ जणांना रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. कोरोना संशयितांना आमदार निवासात क्वॉरंटाइन करण्यात आलं होतं. ९ नवे कोरोनाचे रुग्ण आढळल्यानं नागपूर मनपा क्षेत्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या ६७ झाली आहे.

नागपूर येथे कोरोना संशयितांना आमदार निवासात क्वॉरंटाइन करण्यात आलं होतं. या सर्वांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्यापैकी ९ जणांचे अहवाल आज आले. या अहवालात ९ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. यामुळे नागपूरकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, या ९ जणांपैकी ५ जण हे शांतीनगर परिसरातील असून आता हा परिसर सील करण्यात येत आहे. तथापि, या ९ रुग्णांच्या कुटुंबीयांना आणि शेजाऱ्यांनाही क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे. शिवाय, कोरोनाग्रस्तांच्या कुटुंबीयांचं स्वॅबचे नमुने घेतले जात असून त्यांनाही करोनाची लागण झाली की नाही? याची तपासणी करण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – …तर गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल; अमेरिकेचा चीनला इशारा


राज्यात शनिवारी ३२८ नवे कोरोनाचे रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण रुग्ण संख्या ३६४८ वर पोहोचली. तर काल दिवसभरात ३४ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत राज्यभरात ३६५ रुग्ण बरे झाले आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -