घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेट...तर गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल; अमेरिकेचा चीनला इशारा

…तर गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल; अमेरिकेचा चीनला इशारा

Subscribe

कोरोना विषाणूसंबंधी माहिती लपवल्याचा गंभीर आरोप करत चीनमधील शी जिनपिंग यांच्या सरकारला जबाबदार धरायला हवं, असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी म्हटलं आहे.

कोरोना विषाणूवर सध्या अमेरिका आणि चीनमध्ये कोल्ड वॉर सुरु आहे. चीनने कोरोनाची माहिती लपवली असा आरोप अमेरिकेने केला आहे. दरम्यान, आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला इशारा दिला आहे. चीनने कोरोना विषाणूचा संसर्ग जाणीवपूर्वक पसरवला असेल तर चीनला गंभीर परिणांमांना सामोरं जावं लागेल, असा धमकी वजा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. या आधीही ट्रम्प यांनी चीनला इशारा दिला होता. चीनसोबत त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेला देखील कोरोनाची माहिती लपवण्यासंदर्भात जबाबदार धरलं आहे.

व्हाईट हाऊस येथे पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, “जर ते हेतुपुरस्सर असेल तर त्याचे परिणाम भोगायला तयार राहा.” ट्रम्प म्हणाले की कोविड-१९ चं संक्रमण जगभर पसरण्या आधी चीनशी त्यांचे चांगले संबंध होते. मात्र, आता ज्या पद्धतीने त्यांनी कोरोनाची माहिती लपवली आहे. हे जर खरं असेल तर त्यांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल.

- Advertisement -

कोरोनाच्या फैलावासाठी चीनला जबाबदार धरायला हवं – अमेरिका

कोरोना विषाणूसंबंधी माहिती लपवल्याचा गंभीर आरोप करत चीनमधील शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारला जबाबदार धरायला हवं, असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी म्हटलं आहे. कोरोनाची महामारी वेगानं संपूर्ण जगामध्ये कशी पसरली, याबाबत त्यांना सांगायला हवं असंही त्यांनी म्हटलं आहे. चीनने कोरोनासंबंधी चर्चा करणं सध्या खूपच गरजेचं आहे, असं पोम्पिओ फॉक्स न्यूजशी बोलताना म्हणाले.


हेही वाचा – अमेरिकेचे लक्ष चीनवर…अन् कोरोना आला युरोपमधून

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -