घरमुंबईकोरोनाचे विघ्न; व्हिडिओ कॉलवर घेतले पतीचे अंत्यदर्शन!

कोरोनाचे विघ्न; व्हिडिओ कॉलवर घेतले पतीचे अंत्यदर्शन!

Subscribe

भीतीमुळे गावकरी तयार होईनात

लॉकडाऊनमुळे देशातील सर्व व्यवहार, वाहतूक ठप्प असून ही घोषणा झाल्यापासून सगळे आहे त्या ठिकाणी अडकले आहेत. त्यामुळे मुंबईत निधन झालेल्या आपल्या पतीचे अंत्यदर्शन व्हिडिओ कॉल करून घेण्याची अत्यंत दुर्दैवी वेळ गावी असलेल्या पत्नीवर आली. त्यामुळे ज्याबरोबर गेली ४० वर्ष संसार केला त्या जोडीदाराला भेटण्याचे भाग्य तिला मिळाले नाही. मृत चंद्रकांत लक्ष्मण बांदेकर हे दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात कर्मचारी होते. बांदेकरांना नाटकाचे प्रचंड वेड. दोडामार्ग तालुक्यातलं मोर्ले हे त्यांचं गाव. वासंती आणि त्यांचा त्या काळातला प्रेमविवाह! बांदेकरांचा दोन मुलगे आणि सुना असा परिवार आहे. पण दरवर्षी न चुकता आपल्या पत्नीसह आपल्या मोर्ले गावी यायचे. मोर्ले गावात दरवर्षी रामनवमीला नाट्योत्सव होतो. त्यामुळे बांदेकरही रामनवमीला आवर्जून मोर्लेत यायचेच. मोर्ले गावात सादर होणार्‍या नाटकांमध्ये त्यांचे मोलाचे योगदान असायचे. यावेळच्या रामनवमीलाही ते येणार होते. म्हणूनच होळीला गावी आलेल्या पत्नीला त्यांनी गावीच थांबण्यास सांगितले होते,

पण लॉकडाऊन सुरू झाला आणि गावी येण्याचे सगळे मार्गच बंद झाले. बांदेकरांची तब्येत कर्करोगामुळे खालावल्यामुळे ते रामनवमीला मोर्ले गावी येऊ शकले नाहीत. १६ एप्रिलला दुपारी दोन वाजता चंद्रकांत बांदेकरांचं अकाली निधन झालं. बांदेकरांच्या मुलांनी ही घटना मोर्लेतल्या पोलीस पाटील, सरपंच यांना कळवली. गावी कुणी नातेवाईक नसल्याने बांदेकरांच्या मोर्लेतल्या घरी त्यांची पत्नी वासंती एकट्याच होत्या.

- Advertisement -

करोनामुळे गावकरी तयार होईनात. खरेतर बांदेकरांचे डेथ सर्टिफिकेट गावकर्‍यांपर्यंत पोहोचले होते, तसेच गाडीसाठी लागणार्‍या परवानगीची कागदपत्रेही तयार झाली, पण लॉकडाउनमुळे वासंती याना मुंबईला घेवून जायचे झाल्यास त्यांच्यासोबत गावातील कोणीतरी येणे अपेक्षीत होतं. मात्र, त्यांना पुढील १४ दिवस क्वारंटाई राहणं गरजेचे असल्यामुळे वासंती यांच्यासोबत कोणीच यायाला तयार होईना. शेवटी थोरल्या सुनेने मोर्लेचे पोलीस पाटील तुकाराम चिरमुरे यांच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल केला. त्या मोबाईलवरून आपल्या पतीचा चेहरा पाहताच वासंती यानी टाहो फोडला, ‘बांदेकर तुम्ही मला फसवलंत! अंधेरीतल्या मुलांनाही आईला पाहून दु:ख अनावर झालं. शेवटी व्हिडिओ कॉलवरच पुढचे सगळे विधी एकमेकांना दाखवावे लागले. खरंतर अंधेरीतल्या त्यांच्या निवासस्थानापासून अगदी हाकेच्या अंतरावर संभाजीनगरमध्ये मोर्ले गावचे काही गावकरी राहतात, पण हा सर्व एरिया हॉटस्पॉट असल्यामुळे तिथल्या कुणालाही बाहेर पडून बांदेकरांच्या घरी येता आले नाही. शेवटी पाच जणांनी अ‍ॅम्ब्युलन्समधून पार्थिव नेऊन अंत्यसंस्कार केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -