घरमुंबईमिठागरांच्या जमिनीवर बांधकाम नाही ! पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची स्पष्टोक्ती

मिठागरांच्या जमिनीवर बांधकाम नाही ! पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची स्पष्टोक्ती

Subscribe

मुंबई आणि आसपासच्या मिठागरांच्या जमिनीवर कोणत्याही प्रकारच्या निवासी संकुलांना वा व्यापारी तत्वावरच्या बांधकामांना परवानगी मिळणार नसल्याची स्पष्टोक्ती गुरुवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीटद्वारे दिली.

आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात ट्वीट करताना म्हटले आहे की, मिठागरांच्या जमिनीवर निवासी वा व्यापारी स्वरुपाचे बांधकाम करण्यास परवानगी देण्यात येणार आहे का याबाबत विचारणा होत आहे. मात्र, मिठागरांच्या जमिनीवर अशाप्रकारच्या कोणत्याही निवासी वा व्यापारी तत्वावरच्या बांधकामांना आमचा विरोध असून त्यांना तशी कोणतीही परवानगी मिळणार नाही. मिठागरांच्या या जमिनींशिवाय अशा इतर अनेक जमिनी आहेत. ज्यावर बांधकामे करता येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

दुसरीकडे मिठागरांची मोकळी जागा घरबांधणी करण्यासाठी देऊ नये, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तसे झाल्यास मुंबई आणि मुंबईकरांसाठी ते विनाशकारक ठरेल, असा इशाराही त्यांनी ट्वीटद्वारे दिला आहे. मिठागरे ही आपल्याला ग्लोबल वॉर्मिंगपासून वाचवतात. मुंबईच्या आसपास जी मिठागरे आहेत. त्यावर घरे बांधण्याचा प्रस्ताव होता. परंतु, मिठागरांवर कोणत्याही प्रकारची परवानगी म्हाडाकडून आम्ही देणार नाही. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपले बोलणे झाले आहे. त्यामुळे भविष्यात मिठागरांवर घरे होणार नाहीत, अशी माहिती आव्हाड यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -