घरमुंबईदादर, लोअर परळमध्ये आज पाणी नाही

दादर, लोअर परळमध्ये आज पाणी नाही

Subscribe

ब्रिटीशकालीन तानसा पाईपलाईनचे काम होणार

मुंबई महापालिकेने १०० वर्षे जुन्या पाईपलाईनच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. परिणामी जी नॉर्थ, जी साऊथ या भागात पाणी पुरवठा होणार नाही. बुधवार आणि गुरूवार या दोन्ही दिवशी पाण्याचा पुरवठा होणार नाही. मुंबई महापालिकेकडून १.५ मीटर व्यासाच्या पाईपलाईन दुरूस्तीचे काम होणार आहे. लोअर परळ येथील सेनापती बापट मार्गावर गावडे चौक येथे हे दुरूस्तीचे काम चालणार आहे.

या भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम

माहीम (पश्चिम), दादर (पश्चिम), प्रभादेवी, लोअर परळ, महालक्ष्मी, सात रस्ता या भागातील रहिवाशांना कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होईल.

- Advertisement -

तानसा तलावामार्फत पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईमध्ये गळती झाल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले होते. जवळपास १०० किलोमीटर इतक्या अंतरावरून या पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा मुंबईला होतो. अल्ट्रा साऊंड रॉडच्या माध्यमातून ही पाण्याची गळती शोधण्यात आली आहे. ही पाईपलाईन ब्रिटीशांच्या काळात तयार करण्यात आली असून १०० वर्षे जुनी ही पाईपलाईन आहे.

आव्हाने काय ?

या पाण्याच्या पाईपलाईनवर मलःनिसारण वाहिनी आणि वीज पुरवठा वाहिन्यांचे जाळे आहे. त्यामुळे खणकाम करून लगेच ही पाण्याची गळती शोधून काम करता येणे शक्य होणार नाही. मुंबई महापालिकेच्या अभियंत्याना यासाठी जमीनीत त्या पाईपलाईन नजीकचा होल करून त्याचे काम करावे लागेल. या पाईपची उंची ५ फुट आहे. या पाईपलाईनला होल करून त्यामध्ये शिरून काम करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. याआधीही महापालिकेने दोन होल करून काम करण्याचा प्रयत्न केला होता. पण जमिनीखाली खडक लागल्याने त्या दोन्ही होलच्या ठिकाणी काम करता आले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -