घरमुंबईअनलॉकनंतर मुंबईतील ध्वनी प्रदूषण पुन्हा वाढलं!

अनलॉकनंतर मुंबईतील ध्वनी प्रदूषण पुन्हा वाढलं!

Subscribe

वर्षाअखेरीस मुंबईतील हवेची गुणवत्ता खालवली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने पर्यावरणात अनेक बदल झालेले दिसून आले. दरम्यान मुंबईत असणाऱ्या ट्राफिकमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळण्यात यश आल्याचे दिसून आले. मात्र आता राज्य पून्हा हळूहळू पूर्वपदावर येत असताना मुंबईतील ट्राफिक पुन्हा वाढताना दिसू लागली आहे. ज्यामुळे नियंत्रणात असलेल्या ध्वनीप्रदूषण पातळीत पुन्हा वाढ झाल्याचे समोर आले आहे. २०२० हे वर्ष संपण्यास अवघे काही दिवस असताना मुंबईतील हवामानासंदर्भात चिंताजनक बातमी समोर येत आहे. वर्षाअखेरीस मुंबईतील हवेची गुणवत्ता खालवल्याने ‘वाईट’ हवेची नोंद झाल्याची समोर आले आहे.

२०२० च्या कोरोना महामारीच्या दरम्यान आवाज या फॉऊंडेशनने वांद्रे, एसव्ही रोड, दादर आणि मोहम्मद अली रोड या मुंबईतील रहिवासी आणि व्यावसायिक भागातील ध्वनीपातळी मोजली, त्यामध्ये लॉकडाऊनपूर्वी ट्राफिकच्या आवाजासह इतर ध्वनीची पातळी साधारण ६५ डेसिबल ते १०५ डेसिबलदरम्यान असल्याचे नोंदवण्यात आलं आहे.

- Advertisement -

‘आवाज’ फॉऊंडेशनने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत झालेल्या ध्वनी प्रदूषणाच्या पातळीची नोंद करताना मार्च ते डिसेंबर या महिन्याची आकडेवारी देण्यात आली आहे ती खालील प्रमाणे- मार्च-एप्रिल २०२० मध्ये करण्यात आलेल्या ध्वनीची पातळी ४२.६ ते ६६ डेसिबलदरम्यान होती. एप्रिल-मे ही पातळी ५२.९ ते ६३ डेसिबलपर्यंत आहे.

  • मे २०२० – या महिन्यात ध्वनी प्रदूषणाची पातळी ५२ ते ५६.४ डेसिबल
  • मे-जून २०२० – या महिन्यात ध्वनी प्रदूषणाची पातळी ५२.९ ते ८९.८ डेसिबल
  • जुलै २०२०- या महिन्यात ध्वनी प्रदूषणाची पातळी ५८.० ते ८९.५ डेसिबल
  • ऑगस्ट २०२० – या महिन्यात ध्वनी प्रदूषणाची पातळी ६०.३ ते ८१.८ डेसिबल
  • सप्टेंबर २०२० – या महिन्यात ध्वनी प्रदूषणाची पातळी ६४.० ते ९०.५ डेसिबल
  • ऑक्टोबर २०२० – या महिन्यात ध्वनी प्रदूषणाची पातळी ६४.०२ ते ९४.८ डेसिबल
  • नोव्हेंबर २०२० – या महिन्यात ध्वनी प्रदूषणाची पातळी ६६.०१ ते ९२ डेसिबल
  • डिसेंबर २०२० – या महिन्यात ध्वनी प्रदूषणाची पातळी ६४.०६ ते ९५.६ डेसिबल

मुंबईतील ध्वनी प्रदूषणासंदर्भात २०१८ मध्ये सादर करण्यात आलेल्या नीरी अहवालात वाहतुकीतून निर्माण होणारे ध्वनी प्रदूषण हेच ध्वनी प्रदूषणाचा प्रमुखे स्त्रोत आहे. तर मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर लगेच, वाहनांची रहदारी पूर्णपणे थांबली होती तेव्हा आवाजाची पातळी ६४.६ डेसिबल ते ९५.६ डेसिबल दरम्यान असल्याचे नोंदवण्यात आले. ही पातळी लॉकडाऊनपूर्वीपेक्षा कमी असून ६५ डेसिबल ते १०५ डेसिबलपर्यंत आहे. लॉकडाऊननंतरच्या पहिल्या टप्प्यापेक्षा नक्कीच जास्त आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -