घरमहाराष्ट्रभाजप सुडाचं राजकारण करतंय - अनिल देशमुख

भाजप सुडाचं राजकारण करतंय – अनिल देशमुख

Subscribe

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने पाठवलेल्या नोटीसीवरुन भाजपवर निशाणा साधला. भाजप सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला. भाजप विरोधात बोलणाऱ्यांना ईडीची नोटीस पाठवून त्रास दिला जात आहे. हे सुडाचं राजकारण असून ईडीचा अशा राजकारणासाठी वापर करणं योग्य नाही, असं देशमुख म्हणाले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याची कुणातही ताकद नाही, असा स्पष्ट इशारा दिला.

“भाजप विरोधात बोलणाऱ्यांना ईडीची नोटीस पाठवून त्रास दिला जात आहे. हे सुडाचं राजकारण असून ईडीचा अशा राजकारणासाठी वापर करणं योग्य नाही. अशा पद्धतीचं सुडाचं राजकारण भारतात कुणीही पाहिलं नव्हतं. भाजप हे राजकारण करतं ही गंभीर बाब आहे,” असं अनिल देशमुख म्हणाले. पुढे बोलताना अनिल देशमुख म्हणाले, भाजपच्या विरोधात जे बोलतात त्यांच्याविरोधात सीबीआयचा वापर केला जात होता. त्यामुळे आम्ही सीबीआयला राज्यात येण्यापासून अटकाव केला. त्यामुळे राज्याची परवानगी घेतल्याशिवाय सीबीआय महाराष्ट्रात येऊ शकत नाही. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याची कुणातही ताकद नाही, असा स्पष्ट इशारा दिला. राज्यातील सरकार अभेद्य आहे. हे सरकार पाडण्याची कुणातही ताकद नाही, असं सांगतानाच तीन पक्षाचं सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत असून हे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल, असा विश्वास अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -