घरमुंबईआता अधिष्ठाताही रुग्णसेवा देणार; वैद्यकीय शिक्षण विभागाचा निर्णय

आता अधिष्ठाताही रुग्णसेवा देणार; वैद्यकीय शिक्षण विभागाचा निर्णय

Subscribe

राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांना आता कोणत्याही हॉस्पिटलमध्ये रुग्णांना वैद्यकीय सेवा देणे शक्य होणार आहे. अधिष्ठाता असलेले डॉक्टर विशेष विषयांमध्ये तज्ज्ञ असूनही त्यांना इतर जबाबदाऱ्यांमुळे वैद्यकीय सेवा देणे शक्य होत नाही. पण, वैद्यकीय शिक्षण विभागाकडून अधिष्ठाता देखील रुग्णांची रुग्णसेवा करु शकतील, असा सकारात्मक निर्णय घेतल्याने अधिष्ठातांना त्यांच्या सोयीनुसार रुग्णसेवा देता येऊ शकते.

प्रत्येक अधिष्ठाता हे एखाद्या विशेष विषयात तज्ज्ञ असतात. अधिष्ठाता पद आणि इतर प्रशासकीय जबाबदाऱ्यांमुळे त्यांच्या ज्ञानाचा उपयोग रुग्णसेवेसाठी अनेकदा करुन घेता येत नाही. तसंच, त्यांना रुग्णसेवा द्यायची असल्यास वैद्यकीय शिक्षण विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. आता मात्र विभागाने या नियमांमध्ये बदल केला आहे. त्यात, कोणत्याही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार, आता अधिष्ठात्यांना राज्यातील कोणत्याही इतर शासकीय महाविद्यालयांत वैद्यकीय सेवा देणे शक्य होणार आहे.

- Advertisement -

वैद्यकीय क्षेत्रात अनेक वर्षे काम केल्यानंतर अधिष्ठातापदी नियुक्ती होत असते. इतक्या वर्षात आलेला वैद्यकीय अनुभवाचा वापर अधिष्ठातापदी रुजू झाल्यावर करणं शक्य होत नाही. तेव्हा विद्यार्थ्यांना शिकवण्यासह वैद्यकीय शस्त्रक्रिया करणे याची संधी अधिष्ठात्यांनाही मिळणे आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे डॉक्टरांसह स्वत: अधिष्ठाताही रुग्णसेवा बजावताना आपल्याला दिसतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -