घरCORONA UPDATECoronaVirus: आता केडीएमसीत क्वारंटाईन कालावधी २८ दिवसाचा

CoronaVirus: आता केडीएमसीत क्वारंटाईन कालावधी २८ दिवसाचा

Subscribe

नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये पत्रकार पोलीस शासकीय कर्मचाऱ्यासह एका १२ वर्षीय मुलाचाही समावेश आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात मंगळवारी नवीन सहा रूग्णांची भर पडली, त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांची संख्या १४३ झाली आहे. नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये पत्रकार पोलीस शासकीय कर्मचाऱ्यासह एका १२ वर्षीय मुलाचाही समावेश आहे. तसेच काही व्यक्तींमध्ये १४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहिल्यानंतरही करोनाची लक्षणे आढळल्याने क्‍वारंटाईन कालावधी १४ दिवसावरुन २८ दिवसांपर्यंत करण्‍यात आला आहे.

कल्याण-डोंबिवली शहरात कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये डोंबिवली पूर्वेत राहणारा मुंबईतील एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारालाही कोरोनाची लागण झाली आहे. तसेच खासगी हॉटेलचा कर्मचारी, वाशी एपीएमसी भाजी मंडईतील सुरक्षा रक्षक, कल्याणात राहणारे मुंबईतील खासगी कंपनीचा अभियंता आणि मुंबई येथील पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे. मोहने येथील १२ वर्षीय मुलगा हा कोरोनाबाधित रूग्णांच्या सहवासात असल्याने त्याला लागण झाली आहे. कल्याण डोंबिवली आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून ४५ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे तर ९५ जणांवर उपचार सुरू आहे.

१४ दिवसानंतरही लक्षणे

कोरोना साथीचा प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्‍यासाठी महापालिका क्षेत्रात विविध स्‍तरावर युध्‍दपातळीवर प्रतिबंधात्‍मक कारवाई करण्‍यात येत आहे. महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधित व्‍यक्तीच्‍या संपर्कात आलेल्‍या व्‍यक्तींचे नमुने गोळा करुन त्‍यांना खबरदारी म्‍हणून पुढील १४ दिवस क्‍वारंटाईन करण्‍यात येत आहे. परंतू काही रुग्‍णांना १४ दिवसानंतरही लक्षणे आढळून आलेली आहेत, असे निदर्शनास आले आहे. त्‍यामुळे असे रुग्‍ण १४ दिवसानंतर इतर रुग्‍णांच्‍या संपर्कात येवून इतरांनाही बाधित करण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्‍यामुळे यापुढे कोरोनाबाधित रुग्‍णांच्‍या संपर्कातील व्‍यक्‍ती तसेच प्रवास इतिहास असणाऱ्या प्रवाशांचा क्‍वारंटाईन कालावधी १४ दिवसावरुन २८ दिवसांपर्यंत करण्‍यात येत आहे त्‍याअन्‍वये सदर रुग्‍णांना, रुग्‍णाच्‍या संपर्कात आल्‍यापासून वा बाधित भागातून प्रवास केल्‍यापासून २८ दिवसापर्यंत क्‍वारंटाईन करण्‍यात येणार आहे.

एक प्रतिक्रिया

  1. 14दिवसानंतर कोरोनाची लक्षणे..याचा अर्थ काय ? कोरोना टेस्ट करुन ख्स्त्री करा ना ?
    उगाच क्वारनताईन..चूक वाटते. हा कोणाचा आदेश ?
    Incubation Period maximum 14 days .

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -