घरमुंबईमुंबई महापालिकेला 'ओला'ने दिला मदतीचा हात; २४ वाहनांची सेवा १२ तासांसाठी मोफत

मुंबई महापालिकेला ‘ओला’ने दिला मदतीचा हात; २४ वाहनांची सेवा १२ तासांसाठी मोफत

Subscribe

२४ विभाग कार्यालयांसाठी प्रत्येकी १२ तासांची मोफत वाहनाची सेवा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व विभाग कार्यालयांच्या माध्यमातून उपाययोजना राबवल्या जात आहे. यासाठी कार्यरत असणाऱ्या कामगार, कर्मचाऱ्यांची वाहनांअभावी होणारी गैरसोय लक्षात घेता ओलाने महापालिकेला मदतीचा हात पुढे केला आहे. ओलाच्या माध्यमातून महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमध्ये १२ तासांसाठी प्रत्येकी एक वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. मुंबईत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न होत असला तरी याचा प्रसार झपाट्याने होत आहे. देशात महाराष्ट्र आणि राज्यात मुंबई कोरोनाच्या रुग्णांमध्ये अग्रक्रमावर आहे.

२४ वाहनांची सेवा १२ तासांसाठी मोफत

कोरोनाबाबत महापालिकेतर्फे केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कामगार, कर्मचारी तसेच अधिकारी कार्यरत आहे. मात्र, ट्रेन, रिक्षा तसेच टॅक्सी सेवा बंद असल्यामुळे या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची  होणारी गैरसोय लक्षात घेता, महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी केलेल्या आवाहनाला ओलाने प्रतिसाद दिला आहे, यामध्ये ओला कंपनीने २४ वाहनांची सेवा १२ तासांसाठी मोफत महापालिकेला देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे ही वाहने उपलब्ध करून देण्यात येत आली असून विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनानुसार या वाहनांचा वापर विभागातील कामांसाठी कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी केला जात असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

CoronaVirus: सरकारचा मोठा निर्णय; व्हेंटिलेटर्स, मास्क, PPE वरील सर्व कर रद्द

मात्र, ओलाने महापालिकेला २४ वाहनांच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला असला तरी ही वाहने कमी असल्यामुळे अधिक वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याकरता घनकचरा व्यवस्थापनातर्फे २४ विभाग कार्यालयांमध्ये २४ तासांकरता प्रत्येकी एक याप्रमाणे वाहनांची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी निविदा मागवली आहे. या निविदांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यानुसार प्रत्येक विभाग कार्यालयांसाठी प्रत्येकी दोन वाहने उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ओलाच्यावतीने देण्यात येणाऱ्या वाहनांची बारा तासांची ड्युटी संपल्यानंतर महापालिकेतर्फे भाडेतत्वावर घेण्यात येणाऱ्या वाहनांची सुविधा घेण्यात येईल. तसेच २४ तासांची सुविधा अविरत सुरुच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -