घरमुंबईऑनलाईन मालमत्ता कर भरणाऱ्यांना KYC भरणे बंधनकारक

ऑनलाईन मालमत्ता कर भरणाऱ्यांना KYC भरणे बंधनकारक

Subscribe

मुंबईत पालिकेच्या मालमत्ता करदात्यांची संख्या अंदाजे ४ लाख २५ हजार आहे. त्यापैकी १ लाख ३७ हजार करदात्यांनी केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेने मालमत्ता करदात्यांना आता ऑनलाईन मालमत्ता कर देयके उपलब्ध होण्यासाठी आणि ते भरण्यासाठी सुलभ प्रक्रिया अवलंबली आहे. त्यासाठी प्रत्येक मालमत्ता करदात्याने केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे आता मालमत्ता करदात्यांना मालमत्ता करांशी संबंधित प्रत्येक कामासाठी पालिका वार्ड कार्यालयात चपला झिजविण्याची गरज भासणार नाही. पालिकेच्या लिंकवर संबंधीत मालमत्ता करदात्याने त्यांचा प्रॉपर्टी कार्ड नंबर टाकला की त्याला मालमत्ता करासंदर्भातील आवश्यक माहिती पालिकेकडून वेळोवेळी उपल्बध होणार आहे. मुंबईत पालिकेच्या मालमत्ता करदात्यांची संख्या अंदाजे ४ लाख २५ हजार आहे. त्यापैकी १ लाख ३७ हजार करदात्यांनी केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

महापालिकेतर्फे मालमत्ता करविषयक देयके करदात्यांच्या नोंदणीकृत इ-मेलवर पाठविण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात येत असून त्यासाठी करदात्यांनी महापालिकेच्या https://ptaxportal.mcgm.gov.in/CitizenPortal/ या संकेतस्थळावर जाऊन केवायसी (KYC) फॉर्ममध्ये आपली आवश्यक ती माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे मालमत्ता करदात्यांना जाहीर आवाहन करण्यात येते की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://ptaxportal.mcgm.gov.in/CitizenPortal/ या संकेतस्थळावर जाऊन केवायसी (KYC) फॉर्ममध्ये आपली आवश्यक ती माहिती अद्ययावत करावी. जेणेकरुन मालमत्ता कराविषयी सूचना मिळतील . तसेच मालमत्ता कराचे देयकसुद्धा करदात्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी KYC असणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे.

- Advertisement -

या सुविधेमुळे महापालिका प्रशासनासह करदात्यांनाही मोठा फायदा होणार आहे. कारण त्यांना मालमत्‍ता कर भरला जाणार आहे. कर वेळेवर भरल्यामुळे दंडही आकारण्यात येणार नाही. सोबतच महानगरपालिकेच्‍या विविध योजनांची माहिती नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर एसएमएसद्वारे व नोंदणीकृत ई-मेलद्वारे मिळेल. भविष्‍यातील मालमत्‍ता कराविषयक योजनेची माहिती वेळेत मिळेल. त्याचप्रमाणे करदात्यांच्या मालमत्तेत झालेल्‍या दुरुस्‍तीमुळे सुधारित देयके त्‍वरित उपलब्‍ध होतील. महापालिकेच्‍या देयकांसाठी वापरात असलेल्‍या कागदाचा व त्‍यावरील पोस्टेज, पाकिटे, फ्रॅकिंग या बाबींचा खर्च टाळता येईल. वेळ व पैसा या दोन्हींबाबत करदात्यांसह महानगरपालिकेचीही बचत होणार आहे.


हेही वाचा – विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी राबवणार लोकचळवळ – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -