घरताज्या घडामोडीशेतकरी आंदोलनात होणार पवारांची एंट्री

शेतकरी आंदोलनात होणार पवारांची एंट्री

Subscribe

दिल्लीत सुरू असलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधातल्या आंदोलनासाठी आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहे. आझाद मैदानात होणाऱ्या शेतकरी आंदोलनात शरद पवार यांची उपस्थिती असेल असे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठिंबा दिलेला आहे. या आंदोलनात महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष आणि पक्षांचे नेते तसेच खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्य़ांक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. येत्या २३ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान होणाऱ्या आझाद मैदानातील आंदोलनात शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी ही पक्षाची हजेरी असणार आहे. शरद पवार हे २५ जानेवारी रोजी आंदोलनात सहभागी होणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

- Advertisement -

या आंदोलनाचे आयोजक हे पवार साहेब व माननीय मुख्यमंत्र्यांना भेटले. तसेच काँग्रेसच्या विविध नेत्यांना ही भेटले. २५ तारखेला आयोजकांमार्फत लाँग मार्च काढण्यात येणार आहे. आदरणीय पवार साहेब स्वतः २५ तारखेला तेथे उपस्थित राहणार आहेत, असे नवाब मलिक यांनी सांगितले. काँग्रेसच्या नेत्यांनी व मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा या कार्यक्रमाला होकार दिला आहे. राज्यातील महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा या कृषी कायद्याला विरोध आहे, असे नवाब मलिक म्हणाले.

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांनी शरद पवार कृषीमंत्री असताना त्यांनी देशातील राज्यांना पाठवलेल्या पत्राच्या निमित्ताने भाजपने या मुद्द्यावर टीका केली होती. तसेच शरद पवार यांनीच कृषी उत्पन्न समितीच्या संबंधित कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आवाहन केल्याचे पत्र भाजपकडून व्हायरल करण्यात आले होते. त्यावर शरद पवार यांनीही आपली भूमिका मांडत, आपल्या भूमिकेचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचा खुलासा केला होता.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -