घरमुंबईविद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी राबवणार लोकचळवळ - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी राबवणार लोकचळवळ – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

Subscribe

कोरोनामध्ये मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना पुन्हा शाळेत आणण्यात येणार आहे.

कोरोनामध्ये अनेक विद्यार्थी स्थलांतरित झाले तर अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांचा रोजगार बंद झाल्याने ते शाळेपासून दुरावले. कोरोनामध्ये मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना पुन्हा शाळेत आणण्यात येणार आहे. तसेच शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्याची चळवळ सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

कोरोनामध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले. मात्र अनेक विद्यार्थी हे गावाला गेल्यामुळे ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिले. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, रोजगार बंद झाला. त्यामुळे अनेक विद्यार्थी हे रोजंदारीच्या कामावर जाऊ लागले. त्यामुळे अनेक विद्यार्थी शाळांपासून दूर झाले. शहरामध्ये झोपडपट्टी भागामध्ये तसेच ग्रामीण भागामध्ये शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. अनेक जिल्ह्यांमधील विद्यार्थी हे शेतमजुरी, वीटभट्टीवर काम करत आहेत. आता कोरोनाची परिस्थिती आटोक्यात असून, शाळाही सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आण्यासाठी राज्यात किती विद्यार्थी शाळाबाह्य झाले आहेत याचा तपशील गोळा करण्याच्या सूचना जिल्हानिहाय शिक्षण अधिकार्‍यांना दिल्या आहेत. हा तपशील आल्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेमध्ये कसे आणता येईल यासाठी आम्ही विशेष मोहिम राबवण्यात येणार आहे. या मोहीमेंतर्गत शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, बालरक्षक ग्रामीण भागातील व झोपडपट्टी भागातील घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांची माहिती घेऊन शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

- Advertisement -

शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणणे ही फक्त एक मोहीम नसून ती चळवळ म्हणून आम्ही सुरू करणार आहोत. यासाठी फक्त शिक्षण विभागातील कर्मचारी, शिक्षकच नव्हे तर स्थानिक लोकप्रतिनिधी, समाजसेवक यांचाही सहभाग घेण्यात येणार आहे. शाळाबाह्य विद्यार्थी शाळेत आणणे हा फक्त उपक्रम न राहता ती लोकचळवळ करण्याचा आमचा विचार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -