घरमुंबईआमच्या आमदारांनी उद्धव ठाकरेंना फोन केला नाही!, त्यांचेच आमदार आमच्या संपर्कात; शिंदे...

आमच्या आमदारांनी उद्धव ठाकरेंना फोन केला नाही!, त्यांचेच आमदार आमच्या संपर्कात; शिंदे गटाकडून दावा

Subscribe

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रतिनिधित्व करत असलेल्या  शिवसेनेच्या 11 आमदारांनी उद्धव  ठाकरे यांना त्यांच्या  वाढदिवशी फोनवरून शुभेच्छा दिल्याच्या बातम्यांचे शिंदे गटाकडून खंडन करण्यात आले आहे. उद्धव  ठाकरे यांच्या बाबत आमच्या सर्वांच्या भावना स्पष्ट आहेत. त्यांना भेटण्याचा किंवा फोन करण्याचा प्रश्नच येत नाही. उलट उद्धव  ठाकरेंसोबत असणाऱ्या 13 पैकी 10 आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवशी फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यातील सहा आमदार नंतर मुख्यमंत्री शिंदेंना भेटूनही गेले, असा दावा शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज (16 ऑगस्ट) केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलेल्या आमदारांची नावे मी आता सांगणार नाही, पण ते जेव्हा आमच्याकडे येतील तेव्हा ते कोण होते ते कळतीलच असेही सामंत म्हणाले. (Our MLAs did not call Uddhav Thackeray his own MLAs contacted us A claim by the Shinde group)

हेही वाचा – पटोले थेटच बोलले; आता आम्ही नाही तर, दिल्लीतील काँग्रेस नेतेच करणार पवारांशी चर्चा

- Advertisement -

शिंदे गटाच्या 11 आमदारांनी उद्धव  ठाकरे यांना फोन करून शुभेच्छा दिल्या, या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे सांगताना सामंत म्हणाले की, उद्धव  ठाकरेंना भेटण्याचा किंवा बोलण्याचा संबंध येत नाही. आमची भावना स्पष्ट आहे. वर्षानुवर्षे वेळ मागूनही वेळ न देणे. आमदारांच्या मतदारसंघातील अडीअडचणी, विरोधकांकडून होणारा त्रास यातून मार्ग निघावा ही आमदारांची भावना होती. पण त्यावेळी भेटीचा वेळ मिळाला नाही. कोणी वेळ दिला नाही हे सगळयांना माहिती आहे. त्यामुळे त्यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधावा असे कोणाच्याही मनात नाही.

अनेक लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असतात. आमच्या संपर्कात असतात. मुख्यमंत्री शिंदेचा वाढदिवस होता, तेव्हा मी पूर्ण दिवस त्यांच्यासोबत होतो. त्यादिवशी उद्धव  ठाकरेंसोबतच्या 13 पैकी 10 आमदारांनी  शिंदेंना फोन केला. त्यानंतरच्या दोन -तीन दिवसात रात्री दोन नंतर यातील सहा आमदार शिंदेंना भेटून देखील गेले. ही बातमी ऐकून अस्वस्थ झाल्यानेच हा गैरसमज पसरविण्यात येत आहे. उलट दरम्यानच्या काळात मनीषा कायंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला, असे सामंत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – ‘INDIA’ : मुंबई बैठकीआधीच खडाखडी; काँग्रेस-आपमध्ये ‘या’मुळे वादाची ठिणगी

राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार यांनी सरकारला पाठिंबा दिला आहे. इथे आउटगोईंगचा विषयच नाही इनकमिंगचा विषय आहे. सगळे प्रश्न संपलेले आहेत. गेले वर्षभर समोरून गद्दार, खोके असे शब्द वापरले जायचे. पण अजितदादांचा प्रवेश झाल्यानंतर हे शब्द संपले. आता ते अजितदादांवर चिडचिड करू शकत नाहीत, असा टोला सामंत यांनी ठाकरे गटाला लगावला.

मुंबई- गोवा महामार्ग येत्या वर्षभरात पूर्ण होईल

दरम्यान, मुंबई- गोवा महामार्गाचे काम ठेकेदारामुळे रेंगाळले आहे. मी सिंधुदुर्गचा जेव्हा पालकमंत्री होतो तेव्हा वाकेड पासून सिंधुदुर्गपर्यंत रस्ता करण्यात यशस्वी झालो. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र  चव्हाण हे आता लवकरात लवकर सिंगल लेन तरी गणपतीपर्यंत पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत. येत्या वर्षभरात संपूर्ण रस्ता पूर्ण होईल, असा विश्वासही सामंत यांनी  एका प्रश्नाच्या उत्तरात व्यक्‍त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -