घरमुंबईपटोले थेटच बोलले; आता आम्ही नाही तर, दिल्लीतील काँग्रेस नेतेच करणार पवारांशी...

पटोले थेटच बोलले; आता आम्ही नाही तर, दिल्लीतील काँग्रेस नेतेच करणार पवारांशी चर्चा

Subscribe

मुंबई : काँग्रेसमध्ये (Congress) शरद पवारांबद्दल (Sharad Pawar) कोणताही संभ्रम नाही, तर जनतेत संभ्रम आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत, निर्णय घेण्यास ते सक्षम आहेत आणि त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या  भेटीवर भूमिका स्पष्ट केली आहे. पवार यांनी  इंडिया आघाडी सोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तथापि या सर्व परिस्थितीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते लक्ष ठेवून आहेत. मुंबईतील इंडिया बैठकीच्या वेळी ते शरद पवार यांच्याशी चर्चा करतील, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज (16 ऑगस्ट) दिली. (Patole spoke directly Now if not us only Congress leaders in Delhi will discuss with Pawar)

मुंबईतील एमसीए क्लब येथे काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघातील निरिक्षकांच्या अहवालावर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना पटोले यांनी पवार काका- पुतण्याच्या  भेटीमुळे काँग्रेस पक्षात नाही तर, जनतेत संभ्रम आहे. त्यामुळे येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला होणाऱ्या ‘इंडिया’च्या बैठकीत काँग्रेस श्रेष्ठी या विषयावर शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – ‘INDIA’ : मुंबई बैठकीआधीच खडाखडी; काँग्रेस-आपमध्ये ‘या’मुळे वादाची ठिणगी

आजच्या   बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे दोन प्रतिनिधीही उपस्थित होते. मुंबईत होणाऱ्या ‘इंडिया’च्या बैठकीचा आढावा घेण्यात आला. या महत्वपूर्ण बैठकीतून देशात एक संदेश गेला पाहिजे त्याच्या तयारीवर चर्चा करण्यात आली. मुंबईतील ‘इंडिया’ आघाडीची बैठक देशाला दिशा देणारी ठरेल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

हेही वाचा – Sharad Pawar : लहान लोकांवर भाष्य करणार नाही; अजित पवारांवर निशाणा साधताना ‘त्या’ ऑफरवर केले भाष्य

केंद्रात आणि राज्यातील भाजपाच्या सत्तेला उखडून टाकून काँग्रेसची सत्ता आणणे हाच आमचा प्लॅन आहे. महाराष्ट्र हे काँग्रेस विचारांचे राज्य आहे. काँग्रेस आणि मित्र पक्ष एकत्र येऊन लोकसभा निवडणुका लढवल्या तर, 40 ते 45 जागा जिंकू शकू असे चित्र राज्यात आहे. त्यासाठी काँग्रेसची तयारी करत आहे. आमचे लक्ष्य भाजपा आहे. त्यासाठी जे पक्ष सोबत येतील त्यांच्यासह लढण्याची काँग्रेसची भूमिका आहे. शेतकरी, तरुणांच्या आत्महत्या वाढत आहेत, बेरोजगारी वाढली आहे, नोकऱ्या नाहीत, व्यवसाय चालत नाहीत यातून पुण्यात 218 तरुणांनी आमहत्या केल्या आहेत. राज्यातील इतर भागातही हीच परिस्थिती आहे. पण लोक मेली तरी चालतील पण सत्ता कायम राहली पाहिजे ही सत्तेला चिकटून बसण्याची भाजपची प्रवृत्ती आहे, अशी टीका पटोले यांनी यावेळी केली.

दरम्यान, कोअर कमिटीच्या बैठकीला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बस्वराज पाटील, आमदार कुणाल पाटील, माजी खासदार मिलिंद देवरा आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -