Eco friendly bappa Competition
घर thane कल्याणमध्ये तरुणाच्या हल्ल्यात अल्पवयीन मुलीचा मृत्यू

कल्याणमध्ये तरुणाच्या हल्ल्यात अल्पवयीन मुलीचा मृत्यू

Subscribe

कल्याण पूर्वेतील तिसगाव भागात बुधवारी संध्याकाळी एका २० वर्षाच्या तरुणाने एका 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर धारदार चाकुने सात ते आठ वार करुन तिला ठार मारले. या मुलीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला असल्याचे डाॅक्टरांनी जाहीर केले. हल्लेखोर तरुणाला परिसरातील नागरिकांनी पकडून कोळसेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. आदित्य कांबळे (२०) असे हल्लेखोर तरुणाचे नाव आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. तिसगाव मधील दुर्गा दर्शन सोसायटीच्या आवारात हा प्रकार घडला. या घटनेची माहिती मिळताच साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख घटनास्थळी दाखल झाले.

पोलीस सुत्रांनी सांगितले, संध्याकाळी सात वाजल्यापासून आरोपी आदित्य दुर्गा अपार्टमेंट सोसायटीच्या आवारात येऊन रहिवाशांना संबंधित मुलगी घरी किती वाजता येते याची माहिती घेत होता. रहिवाशांना तो कशासाठी माहिती घेतो याची जाणीव झाली नाही. आदित्य मृत मुलगी राहत असलेल्या सोसायटी परिसरात दबा धरुन बसला होता. मृत मुलगी बुधवारी रात्री आठ वाजता आपल्या आई सोबत खासगी शिकवणी वर्गावरुन घरी येत होती. सोसायटीतील जिन्यातून घरात जात असताना आदित्यने पाठीमागून येऊन मुलीच्या आईला ढकलून देऊन मुलीवर चाकुने आठ वार केले. तिच्या आईने मुलाला विरोध करण्याचा प्रयत्न केला. बेभान झालेल्या आदित्यने आईला दाद दिली नाही. छातीवर जिव्हारी घाव झाल्याने मुलगी जिन्यात कोसळली. आईने ओरडा करताच सोसायटीतील रहिवासी, पादचारी घटनास्थळी धाऊन आले.

- Advertisement -

आदित्य तेथून पळून जात होता. रहिवाशांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. गंभीर जखमी मुलीला तात्काळ लगतच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरू करताच तिचा मृत्यू झाला असल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. मिळालेली माहिती अशी की, या मुलीला आरोपी आदित्यने दोन वेळा प्रेमासाठी गळ घातली होती. मुलीने त्यास नकार दिला होता. तो राग त्याच्या मनात होता. त्या रागातून त्याने हे कृत्य केले असल्याचे समजते. कल्याण पूर्व भागात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -