घरमुंबईपाकिस्तानी म्हणजे झिंगलेली माकडं - उद्धव ठाकरे

पाकिस्तानी म्हणजे झिंगलेली माकडं – उद्धव ठाकरे

Subscribe

शिवसेनेने सामना अग्रलेखातून पाकिस्तानवर सडकून टीका केली आहे. पाकिस्तानी हे दारू पिऊन झिंगलेली माकडं आहेत, असे आजच्या अग्रलेखात नमूद केले आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता पाकिस्तानचा खरपूस समाचार घेतला आहे. सामना अग्रलेखातून त्यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली आहे. पाकिस्तानी हे दारू पिऊन झिंगलेली माकडं आहेत, असे आजच्या अग्रलेखात नमूद केले आहे. पाकिस्तानला नेतृत्व नाही, दिशा नाही म्हणून इस्लामाबादला शनिवारी घडले तसे प्रकार घडतात. दिल्लीतील पाक उच्चायुक्तांच्या इफ्तार पार्टीवर हिंदुस्थान सरकारने नियंत्रण आणले. कारण त्या पार्टीत कश्मीरातील फुटीरतावाद्यांसाठी पायघड्या घातल्या होत्या. हिंदुस्थानच्या सार्वभौम स्वातंत्र्यास आव्हान देणाऱ्यांना पाक उच्चायुक्त शिरकुर्मा खिलवणार असतील तर त्यांना रोखावे लागेल, पण इस्लामाबादमधील हिंदुस्थानी उच्चायुक्तांनी असे काहीच केले नव्हते. म्हणूनच आम्ही म्हणतो, पाकिस्तानी माकडांनी दारू पिऊन तमाशा केला. सरकारने हा तमाशा विसरू नये, असे त्यांनी अग्रलेखात म्हटले आहे.

काय आहे अग्रलेखात 

पाकिस्तानची अवस्था दारू पिऊन झिंगलेल्या माकडासारखी झाली असून इस्लामाबादेत भारतीय उच्चायुक्तांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत या झिंगलेल्या माकडांनी घातलेला गोंधळ असह्य असल्याचे टीका शिवसेनेने केली आहे. बालाकोट हवाई हल्ल्यानंतर मोदी सरकारने मुजोर पाकड्यांची नांगी ठेचलीच आहे, पण शेपूट अजूनही वळवळत असून सरकारने हा तमाशा विसरू नये, असे देखील शिवसेनेने म्हटले आहे. भारताने पुलवामा हल्ल्याचा बदला बालाकोट येथे हवाई हल्ला करुन घेतला. तेव्हापासून पाकिस्तान तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत असून यानंतर भारताच्या राजनैतिक यंत्रणेने जोर लावून मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले. हे फुटके थोबाड घेऊन पाकिस्तानला जगासमोर येणे कठीण असतानाच मोदी सरकार पुन्हा भरघोस बहुमताने सत्तेवर आले. या धक्क्यातून पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान सावरणे कठीण आहे, अशा शब्दात शिवसेनेने पाकचा समाचार घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -