घरमुंबईएमएचटी-सीईटी निकाल जाहीर

एमएचटी-सीईटी निकाल जाहीर

Subscribe

MHT-CET चा निकाल https://mhtcet2019.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता सर्वत्र घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल सोमवारी मध्यरात्री पासून https://mhtcet2019.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला असून आज संपुर्ण दिवस विद्यार्थांना हा निकाल बघता येणार आहे.

- Advertisement -

अव्वल गुणांसह हे दोघे ठरले टॉपर 

एमएचटी-सीईटी परीक्षेमध्ये मुंबईची किमया शिकारखाने तसेच अमरावतीचा सिद्धेश अग्रवाल ९९.९८ टक्के इतक्या अव्वल गुणांसह टॉपर ठरले आहेत.

- Advertisement -

राज्यातून ४ लाख १३ हजार २८४ विद्यार्थ्यांची नोंदणी

राज्याच्या प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेतलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेसाठी राज्यातून ४ लाख १३ हजार २८४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ लाख ९२ हजार ३५४ विद्यार्थ्यी प्रत्यक्ष परीक्षेस बसले होते. तसेच २० हजार ९३० विद्यार्थी परिक्षेत गैरहजर राहिले होते. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स अर्थात पीसीएम विभागातून २ लाख ७६ हजार १६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती तर पीसीबी म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विभागातून २ लाख ८१ हजार १५४ विद्यार्थ्यी परिक्षेस बसले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -