घरमहाराष्ट्रबेरोजगारीवरून शिवसेनेची भाजपावर टीका 

बेरोजगारीवरून शिवसेनेची भाजपावर टीका 

Subscribe

निवडणुकीआधी भांडण मिटवून एकत्र नांदायला लागलेल्या शिवसेना-भाजपाचा संसार आता कुठे सुरळीत सुरू असताना आज शिवसेनेने पुन्हा एकदा अग्रलेखातून भाजपाल डिवचले आहे

निवडणुकीआधी भांडण मिटवून एकत्र नांदायला लागलेल्या शिवसेना-भाजपाचा संसार आता कुठे सुरळीत सुरू असताना आज शिवसेनेने पुन्हा एकदा अग्रलेखातून भाजपाल डिवचले आहे. ‘मोदी है तो मुमकीन है’ याच मंत्रावर विश्वास ठेवून कोट्यवधी बेरोजगार तरुणांनी मोदी यांच्या विजयास हातभार लावला. त्यामुळे मागच्या पाच वर्षांत रोजगारनिर्मितीत झालेली घसरण थांबावून २०१९ साली बेरोजगारांना काम देणे हे एकमेव ध्येय आता असायला हवे. सरकार पक्षाचे म्हणणे असे की, बेरोजगारी वाढत आहे हे काही आमचे पाप नाही. बेरोजगारीचा प्रश्न हा काही गेल्या पाच वर्षांत भाजपने तयार केलेला नाही असे श्री. नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. आम्ही त्यांचे मत मान्य करतो, पण दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन होते व त्या हिशेबाने मागच्या पाच वर्षांत किमान दहा कोटी रोजगाराचे लक्ष्य पार करायला हवे होते ते झालेले दिसत नाही व त्याची जबाबदारी नेहरू-गांधींवर टाकता येणार नाही असे सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हणण्यात आले आहे.

काय आहे नेमकं अग्रलेखात 

महाराष्ट्र व देशाचे चित्र विदारक आहे. शेती जळून गेली व हाताला काम नाही या चक्रात सापडलेल्या शेतकऱयांनीही नवी आशा घेऊन मोदी यांना मतदान केले आहे. ‘मोदी है तो मुमकीन है’ याच मंत्रावर विश्वास ठेवून कोट्यवधी बेरोजगार तरुणांनीही मोदी यांच्या विजयास हातभार लावला आहे. त्यामुळे मागच्या पाच वर्षांत रोजगारनिर्मितीत झालेली घसरण थांबवून 2019 साली बेरोजगारांना काम देणे हे एकमेव ध्येय आता असायला हवे. महागाई, बेरोजगारी, घटते उत्पादन व बंद पडत चालेले उद्योग या आव्हानांना तोंड द्यावे लागेल. शब्दभ्रमाचे खेळ करून बेरोजगारी हटणार नाही. अर्थव्यवस्था संकटात आहे. नव्या अर्थमंत्र्यांनी मार्ग काढावा!

- Advertisement -

या आधीही अग्रलेखातून अनेकदा टीका

दरम्यान, अग्रलेखातून भाजपावर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नसून, याआधी देखील शिवसेनेने भाजपावर अनेकदा टीका केली आहे. मात्र युती झाल्यानंतर शिवसेना गेल्या काही दिवसांपासून भाजपावर आणि मोदी सरकारवर स्तुती करताना दिसत होती. मात्र आज बेरोजगारीच्या मुद्यावर थेट मोदी सरकारचे कान टोचल्याने पुन्हा एकदा चर्चेणा उधाण आलं आहे.

हेही वाची –

पावसाळी अधिवेशन विधानसभा विरोधीपक्ष नेत्याशिवायच?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -