घरमनोरंजन'सौदामिनी' एक तडफदार पोलिस ऑफिसर

‘सौदामिनी’ एक तडफदार पोलिस ऑफिसर

Subscribe

सौदामिनी नावाच्या पोलिसाचे आणि दमदार भुमिका अभिनेत्री हर्षदा खानविलकर साकारणार आहे. तेंव्हा सौदामिनी कडकडेच्या मालिकेत येण्याने मालिका कुठल्या वेगळ्या वळणावर येईल हे बघणे रंजक असणार आहे.

कलर्स मराठीवरील घागडे आणि सून ही मालिकेने एक महत्त्वाच वळण घेतले आहे. कियारा गरोदर नव्हती हे आता घरच्यांना कळले आहे. आता लवकरच अक्षय कियाराबरोबर दुबईला जाणार आहे. त्यामुळे घाडग्यांच्या घरात तणावाच वातावरण आहे. यातच मालिकेत आता एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. हे पात्र आहे सौदामिनी नावाच्या पोलिसाचे आणि दमदार भुमिका अभिनेत्री हर्षदा खानविलकर साकारणार आहे. तेंव्हा सौदामिनी कडकडेच्या मालिकेत येण्याने मालिका कुठल्या वेगळ्या वळणावर येईल हे बघणे रंजक असणार आहे.


हर्षदा खानविलकर साकारत असलेली पोलीस ऑफिसर सौदामिनीला पुरुषांविषयी विशेष चीड आहे. त्यामुळे कियाराच्या खोट्या बोलण्यामध्ये येऊन ती अक्षय आणि घाडग्यांना जबाबदार धरणार का? सौदामिनी हा कियाराचा हा डाव तर नाही ना ? येत्या भागांमध्ये सौदामिनी घाडगेंना इंटरोगेट का करणार आहे? नेहमी घाडग्यांना संकटातून वाचवणारी अमृता यातून कसा मार्ग काढेल? हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. २ जून ते ९ जून या आठवड्यामध्ये सौदामिनी आणि घाडगे कुटूंब यांच्यात हा आठवडा रंगणार आहे.

खूप दिवसांनी मी एखद्या मालिकेत काम करणार आहे. घागडे आणि सून ही खूप लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेचा छोटासा भाग मला होता येणार आहे. यात मी एका तडफदार पोलिस अधिकाऱ्याची भुमिका साकारणार आहे. या आधी मी ‘नवरा असावा तर असा’ हा कार्यक्रम करायचे त्याची स्क्रीप्ट अशी लिहीली नव्हती. पण आता या मालिकेमुळे एक स्क्रीप्टमला पाठ करावी लागणार आहे. सगळे माझे जूनेच मित्र आहेत. त्यामुळे या टीमबरोबर काम करताना खूप मजा येत आहे.- हर्षदा खानविलकर, अभिनेत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -