घरमुंबई'मला मुंडेंच्या मृत्यूचे राजकारण करायचे नाही'

‘मला मुंडेंच्या मृत्यूचे राजकारण करायचे नाही’

Subscribe

अमेरिकेचे सायबर एक्सपर्ट सय्यद शुजा यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत केलेल्या दाव्यावर पंकजा मुंडे यांनी मौन सोडले आहे. 'मला मुंडेंच्या मृत्यूचे राजकारण करायचे नाही', असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम मशीन हॅंकिंगबद्दल माहिती झाल्याने त्यांची हत्या करण्यात असल्याचा दावा अमेरेकिचे सायबर एक्सपर्ट सय्यद शुजा यांनी केला आहे. याप्रकरणी गोपीनाथ मुंडे यांची ज्येष्ठ कन्या आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले मौन सोडले आहे. ‘मी हॅकर नाही. मी गोपीनाथ मुंडेंची मुलगी आहे. मला मुंडेंच्या मृत्यूचे राजकारण करायचे नाही’, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – ..म्हणून झाली गोपीनाथ मुंडेंची हत्या? सायबर एक्स्पर्टचा धक्कादायक दावा!

- Advertisement -

नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

पंकजा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, ‘मी हॅकर नाही. मी गोपीनाथ मुंडेंची मुलगी आहे. मला मुंडेंच्या मृत्यूचे राजकारण करायचे नाही. गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू झाल्यानंतर मी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे सीबीआय चौकशीची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण झाली आहे. त्यातून माझे समाधान झाले आहे. याबाबतीत आणखी चौकशी करायची असेल, तर देशातील मोठे नेते याबाबत निर्णय घेतील’. त्याचबरोबर ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकत नाही, असे निवडणूक आयोगाने वारंवार सांगितले असल्याचेही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

पंकजा मुंडे अस्वस्थ

अमेरिकेच्या हॅकरने गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत केलेल्या दाव्यामुळे पंकजा मुंडे अस्वस्थ झाल्या होत्या. त्यांनी याविषयी कुणालाही कुठलीही प्रतिक्रिया न देण्याचा निर्णय घेतला होता. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत त्या उपस्थित नव्हत्या. विशेष म्हणजे पंकजा मुंडे मुंबईतच होत्या.

- Advertisement -

हेही वाचा – गोपीनाथ मुंडेंच्या वृत्तामुळे पंकजा मुंडे अस्वस्थ; मंत्रिमंडळ बैठकीला दांडी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -