घर महाराष्ट्र गोपीनाथ मुंडेंच्या वृत्तामुळे पंकजा मुंडे अस्वस्थ; मंत्रिमंडळ बैठकीला दांडी

गोपीनाथ मुंडेंच्या वृत्तामुळे पंकजा मुंडे अस्वस्थ; मंत्रिमंडळ बैठकीला दांडी

Subscribe

आंतरराष्ट्रीय हॅकर सय्यद शुजा याने काल केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाल्याचा खळबळजनक दावा केला होता. ‘२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनचे हॅकिंग झाले होते’ याची माहिती मुंडे यांना मिळाल्यामुळेच त्यांची हत्या झाली, असे लंडन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत शुजा म्हणाला होता. या वृत्तामुळे भारतात खळबळ माजली आहेच. त्याशिवाय मुडेंच्या कन्या पंकजा मुंडे देखील अस्वस्थ झाल्या आहेत. कालपासून त्यांनी कुणालाही कुठलीही प्रतिक्रिया न देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे आज राज्य मंत्री मंडळाची बैठक होती. मात्र मुंबईत असूनही पंकजा मुंडे यांनी या बैठकीला उपस्थित राहणे टाळले.

मुंबईत असूनही बैठकीला गैरहजर

आपलं महानगरला विश्वसनीय सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार पंकजा मुंडे या सध्या त्यांच्या मुंबईतल्या घरी आहेत.  “कुणालाही भेटू देऊ नका. मला कसल्याच विषयावर सध्या बोलायचे नाही.”, अशी सक्त ताकिद त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिली आहे.

सुधीर भाऊंची मात्र सारवासारव

- Advertisement -

दरम्यान याबद्दल अर्थमंत्री सुधीर भाऊ यांना विचारले असता त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. “अनेकवेळा मंत्र्यांना त्यांच्या मतदारसंघातही कामे असतात. तसेच त्यांच्या विभागाच्या कार्यक्रमांसाठीही त्यांना बाहेर जावे लागते. त्यामुळे मंत्र्यांना कधी कधी मंत्रीमंडळ बैठकीला हजेरी लावता येत नाही. पंकजा मुंडे परवानगी घेऊनच गैरहजर राहिल्या आहेत”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

धंनजय मुंडेंनी मात्र चौकशीची मागणी केली

दरम्यान शुजाने केलेल्या आरोपाबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -