घरमुंबईविधानसभेच्या उमेदवारीविषयी अखेर बोलले पार्थ पवार...!

विधानसभेच्या उमेदवारीविषयी अखेर बोलले पार्थ पवार…!

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, त्यावर आता खुद्द पार्थ पवार यांनीच मौन सोडलं आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान आपल्या वेगळ्या प्रचार स्टाईलमुळे चर्चेत राहिलेल्या, मात्र अंतिमत: पराभूत झालेल्या पार्थ पवार यांनी ‘आपण फक्त लोकसभा निवडणूकच लढवणार असून विधानसभा निवडणूक लढवणार नाही’, असं स्पष्ट केलं आहे. रविवारी बदलापूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. या वेळी लोकसभा निवडणुकीसाठी पार्थ पवार मावळ मतदारसंघातून उभे होते. मात्र, त्यांना शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरून देखील बरीच चर्चा झाली होती.

चर्चांना पूर्णविराम…

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, सलाम फाऊंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आशिष दामले यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखूमुक्त अभियान रविवारी बदलापुरातील गुरूकुल स्टडी सेंटर येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना तंबाखू मुक्तीसाठीची शपथ देण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघात पराभूत झाल्यानंतर राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, ती शक्यता पार्थ पवार यांनी यावेळी बोलताना फेटाळून लावली आहे.

- Advertisement -

वाचा – पार्थची जागा न येणारीच होती – शरद पवार

भाजप सरकारवर साधला निशाणा

येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी सांघटनात्मक काम करणार असल्याचे पार्थ पवार यांनी सांगितले. ‘आपण पराभूत झालो असलो तरी हरलेलो नाही त्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून जाण्याचे कारण नाही. उलट नव्या जोमाने कामाला लागायला हवे’, असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले. लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी सर्वसामान्यांसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षांत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे देखील माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले. दरम्यान, ‘सध्याचे केंद्रातील आणि राज्यातील सरकार एक आभासी विकास मतदारांना दाखवण्यात यशस्वी झाले आहे. मात्र, जमिनीवर कामे अजूनही दिसत नाहीत’, अशा शब्दांत त्यांनी भाजप आघाडी सरकारवर टीका केली.


Video: पार्थच्या पराभवावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

पार्थ यांच्या उमेदवारीचं नाट्य!

लोकसभा निवडणुकांआधी पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरून भलतीच चर्चा रंगली होती. खुद्द शरद पवार आधी मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. त्यासाठी पवारांनी अनुकूल संकेत देखील दिले होते. मात्र, ऐनवेळी सूत्र वेगानं फिरली आणि शरद पवारांनी माघार घेत पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -