घरमनोरंजनपारू आणि शिवाचा गोंधळ - झी मराठीवर प्रेक्षकांची आगपाखड !

पारू आणि शिवाचा गोंधळ – झी मराठीवर प्रेक्षकांची आगपाखड !

Subscribe

गेल्या काही महिन्यांमध्ये झी मराठीचा टीआरपी खाली घसरला आहे.  झी मराठी त्यासाठी नवनवे कार्यक्रम घेऊन येत आहे. त्यापैकीच दोन नव्या मालिका नुकत्याच प्रसारित झाल्या आहेत. ‘पारू’ आणि शिवा’ अशी या दोन मराठी मालिकांची नावे आहेत.

१२ फेब्रुवारीला या दोन्ही मालिका झी मराठीवर सुरु होणार होत्या. सहाजिकच प्रेक्षकही त्या पाहण्यासाठी आतुर होते. ठरल्याप्रमाणे साडेसात वाजता ‘पारू’ ही मालिका प्रसारीत झाली. अहिल्यादेवी किर्लोस्कर यांच्या घरात अवखळ पण निरागस स्वभावाच्या पारूचा प्रवेश झाला आहे. पण कडक शिस्तीच्या अहिल्यादेवींना पारू तेवढीशी रूचलेली नाही. हे कथानक आता इथूनच पुढे विस्तारलं जाईल. आठ वाजता ही मालिका संपल्यावर पुढे नऊ वाजता दुसरी नवी मालिका ‘शिवा’ सुरु होणार होती. पण झालं असं की, शिवा मालिका न लागता त्याऐवजी आधीच होऊन गेलेली पारू ही  मालिका पुन्हा प्रसारित झाली.

- Advertisement -

झी मराठीच्या सदर  गोंधळी कारभारावर प्रेक्षक नाराज झाले. अनेकांना या मालिकेची उत्सुकता होती.मात्र, त्यांचा चांगलाच हिरमोड झाला. त्यामुळे वैतागलेल्या प्रेक्षकांनी सोशल मीडियाद्वारे झी मराठीवर चांगलीच टीका केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -