घरमुंबईवाड्यात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

वाड्यात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

Subscribe

सराईत गुन्हेगार जेरबंद

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाडा पोलिसांनी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये काही सराईत गुन्हेगार हाती लागले. तसेच पोलिसांनी रोड मार्चही काढण्यात आला.

राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरव सिंंग यांच्या आदेशाने जिल्हाभर रोड मार्चचे आयोजन करण्यात आले होते. जव्हारचे उप विभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी रात्री दहा वाजता वाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत रोड मार्च काढण्यात आला. पोलीस निरीक्षक जयकुमार सुुर्यवंशी यांच्यासह पोलीस निरीक्षक, पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी या रोड मार्चमध्ये भाग घेतला होता. वाडा पोलीस स्टेशन, खंडेश्वरी नाका, परळी नाका दरम्यान रोड मार्च काढण्यात आला.

- Advertisement -

त्यानंतर पहाटे अंजनीनगर, नेहरूनगर या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन घेऊन 2 फरारी आरोपी , 5 पाहिजे आरोपी, 2 हिस्ट्रीसिटर चेक केले असता 2 हिस्ट्रीसिटर मिळून आले. कुडूस दुरक्षेत्र येथे रूट मार्च व लक्ष्मी नगर तसेच डोंगर पाडा येथे कोम्बिंग ऑपरेशन घेतले असता 6 पाहीजे आरोपी व 1 हिस्ट्रीसिटर चेक केले असता 1 हिस्ट्रीसिटर हाती लागला.

या रोड मार्चमध्ये पोलीस उपविभागीय अधिकारी भागवत सोनावणे यांच्यासह 3 पोलीस निरीक्षक, 6 पोलीस अधिकारी, 65 पोलीस कर्मचारी, होमगार्ड व आरसीपीचे जवान यांचा समावेश होता. यावेळी वाडा पोलीस ठाण्यातील पाच वाहन वापरण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisement -

पोलीस गस्त, नाकाबंदी वाढवली
निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी पालघर पोलिसांनी दररोज नाकाबंदी, गस्त आणि कोम्बिंग ऑपरेशन सुरु केले आहे. संवेदनशील भागात गुरुवारी रात्री केलेल्या कोंम्बिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांनी हिस्ट्रीसिटर आणि संशयित अशा चारशेहून अधिकांची तपासणी केली.

पालघर पोलिसांनी वसई, विरार, नालासोपारा, पालघर, डहाणू आणि जव्हार पोलील ठाण्याच्या हद्दीत काल रात्रभर कोंम्बिंग ऑपरेशन केले. यावेळी पोलीस ठाण्यातील हिस्ट्रीसिटर, पाहिजेत आरोपी, तडीपार, संशयीत आरोपींची तपासणी करण्यात आली. तसेच शहरातील लॉजेसचीही तपासणी करण्यात आली.

निवडणुकीच्या काळात अवैध दारु वाहतूक, रोख रक्कम यांची होणारी वाहतूक रोखण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. यावेळी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. यात दोषी आढळणार्‍यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -