घरमुंबई'इंडियाना बार'कारवाईप्रकरणी पोलीस शिपाई निलंबित

‘इंडियाना बार’कारवाईप्रकरणी पोलीस शिपाई निलंबित

Subscribe

बेकायदेशीर कृत्य होणार नाही, ही सर्वस्वी जबाबदारी असताना त्यांनी कर्तव्यात कसुर केल्याचा आरोपाखाली ताडदेव पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई सासवे यांना निलंबित करण्यात आले आहे.

ताडदेव येथील ‘इंडियाना बार’वर गुन्हे शाखेकडून झालेल्या कारवाईप्रकरणी पोलीस शिपाई विश्वनाथ मलिनाथ सासवे या पोलीस शिपायावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. परिसरात कोणतेही बेकायदेशीर कृत्य होणार नाही, ही सर्वस्वी जबाबदारी असताना त्यांनी कर्तव्यात कसुर केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. विश्वनाथ सासवे हे सध्या ताडदेव पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत.

नेमके काय घडले?

हाजीअली बीट चौकी येथे २३ मार्चला पोलीस शिपाई सासवे रात्री कर्तव्यावर हजर होते. या परिसरात कोणतेही बेकायदेशीर कृत्य होणार नाही यासाठी त्यांची तिथे नेमणूक करण्यात आली होती. तरीही गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी शनिवारी रात्री उशिरा ताडदेव येथील ‘इंडियाना बार’वर कारवाई केली. या बारमध्ये आठ बारबाला तिथे आलेल्या ग्राहकांशी अश्लील वर्तन करीत होते. तसेच ग्राहक बारबालांवर पैशांची उधळण करताना आढळून आले. याच प्रकरणात नंतर बार मॅनेजरसह वेटर, इतर कर्मचारी आणि ग्राहक अशा ४७ जणांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर या सर्वांची जामिनावर सुटका करण्यात आली असून याबाबत विश्वनाथ सासवे यांनी कर्तव्य बजाविताना कसूर केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्यांच्यावर पोलीस आयुक्तांनी निलंनाची कारवाई केली आहे. त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरु करण्यात आली आहे. निलंबन काळात त्यांना स्वियेत्तर सेवा, निर्वाह भत्ता आणि इतर भत्ते देण्यात येतील. तसेच त्यांनी निलंबन काळात कुठेही खाजगी नोकरी अथवा व्यवसाय करु नये. आपण कुठेही नोकरी किंवा धंदा करीत नसल्याचे त्यांनी प्रमाणपत्र दाखल केल्याशिवाय त्यांना निर्वाह भत्ता मिळणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -