घरमुंबईओला-उबेरची विधीमंडळावर धडक; पोलिसांनी लावला ब्रेक

ओला-उबेरची विधीमंडळावर धडक; पोलिसांनी लावला ब्रेक

Subscribe

ओला-उबर कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून त्यासाठी लालबाग ते विधान भवन असा मोर्चा काढण्यास सुरुवात केली. मात्र संपकरी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी भारतमाता सिनेमाजवळच रोखले.

ओला-उबर कर्मचाऱ्यांनी आज, सोमवार १९ नोव्हेंबर रोजी संप पुकारला असून त्यासाठी लालबाग ते विधान भवन असा मोर्चा काढण्यास सुरुवात केली. मात्र संपकरी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी भारतमाता सिनेमाजवळच रोखले. विविध मागण्यांसाठी ओला-उबर चालकांनी हा संप पुकारला आहे. सर्व टॅक्सी चालक आज एकत्र जमून विधान भवनापर्यंत मोर्चा काढण्याच्या पवित्र्यात होते. मात्र पोलिसांनी सुरुवातीलाच हा मोर्चा हाणून पाडला आहे. सर्व संपकरींना पोलिस आझाद मैदानात घेऊन गेले.

वाचा : मेगाब्लॉकसोबतच ओला-उबर चालकांच्या संपामुळे मुंबईकर त्रस्त

- Advertisement -

वाचा : ओला-उबर चालकांचा आज मध्यरात्रीपासून पुन्हा संप!

वाचा : ओला उबर गाड्यांना पुन्हा लागणार ब्रेक

- Advertisement -

शनिवार मध्यरात्रीपासून संपावर  

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या ३० हजार ओला-उबर चालकांनी शनिवार, १७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून पुन्हा संपावर जाण्याचा निर्णय घेतला. दिवाळी निघून गेल्यानंतरही सरकारने त्यांच्या मागण्या मान्य न केल्यामुळे त्यांनी हा संप पुकारला. दिवाळी अगोदरही त्यांनी १२ दिवसांचा संप पुकारला होता. त्यानंतर परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत दिवाळी संपल्यानंतर १५ नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. परंतू, सरकारकडून चालकांच्या मागण्यांवर कुठल्याही प्रकारची हालचाल झालेली दिसत नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा संप पुकारला आहे.

वाचा : ओला, उबेर चालकांकडून प्रवाशांची लूट सुरुच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -