घरमुंबईओला उबर गाड्यांना पुन्हा लागणार ब्रेक

ओला उबर गाड्यांना पुन्हा लागणार ब्रेक

Subscribe

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरही कोणताही लाभ झाला नसल्याने ओला, उबर चालकांनी पुन्हा संपाची घोषणा केली आहे.

ओला, उबर टॅक्सीचालक-मालकांनी पुन्हा एकदा संपाची घोषणा केली आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरही कोणताही लाभ झाला नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आपल्या मागण्यापूर्ण होईपर्यंत संप करणार असल्याचे संघटनांनी सांगितले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांसाठी प्रवशांना ओला, उबरहून प्रवास करण्यास अडचण निर्माण होणार आहे. शनिवार १७ नोव्हेंबरपासून संपाला सुरुवात होणार आहे. सरकारी पातळीरील चर्चा अयशस्वी ठरल्याने संपाचा निर्णय कायम ठेवणार असून मागण्या पूर्ण न झाल्यास मंत्रालयावरही मोर्चा काढणार असल्याचे सांगितले जात आहे.

काय आहे प्रकरण 

आपल्या मागण्यांसाठी दिवाळीपूर्वी सलग १२ दिवस संपावर ओला उबर चालक-मालक संघटना संपावर गेल्या होत्या. संपावर असताना त्यांनी आंदोलन केले होते. मात्र मागण्या मान्य होत नसल्यामुळे मातोश्रीवर मोर्चा काढण्याचा इशारा संघटनेने दिला होता. अखेर परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी संघटनेची भेट घेतली होती. त्यांच्या मागण्यांवर लवकरच विचार केला जाणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले होते. मात्र अजूनही आपल्या मागण्यापूर्ण न झाल्याने पुन्हा आंदोलन करण्यात येणार आहे.

- Advertisement -

काय होत्या मागण्या

ओला, उबेर चालकांनी ऑनलाइन टॅक्सीचे किमान भाडे १०० ते १५० रुपये असावे. प्रति किलोमीटर १८ ते २३ रुपये भाडे असावे. कंपनीने नवीन वाहने बंद करून सुरू असलेल्या वाहनांना समान काम द्यावे. या मागण्यांसाठी २२ ऑक्टोबरपासून संप पुकारलेला होता. त्यावर अखेर १२ दिवसानंतर तोडगा निघाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -