घरमुंबईगणेशोत्सव मंडळांकडून पोलिसांना मिळणार आरतीचा मान

गणेशोत्सव मंडळांकडून पोलिसांना मिळणार आरतीचा मान

Subscribe

मुंबईतील राणी बागचा चिंतामणी, नायगावचा विघ्नहर्ता, ॐ तांडव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, आर्थर रोडचा राजा, ग्रॅन्ट रोडचा राजा, बोरिवलीचा विघ्नहर्ता यासारख्या अनेक मंडळांनी पोलिसांना आरतीचा मान देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारे ‘आरतीचा मान’ या उपक्रमाद्वारे पोलीस या उत्सवात सहभागी होणार आहेत. आजवर मुंबईतील काही मोठ्या मंडळांनी हा उपक्रम राबवला होता, मात्र आता अनेक मंडळांनी या उपक्रमाला सुरुवात केली आहे.

मुंबईत गेली अनेक वर्षे गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या उत्सवाच्या काळात काही अनुचित प्रकार घडू नये, याकरता राज्यभरातून पोलीस दल मुंबईत तैनात केले जाते. हे पोलीस कर्मचारी रात्रंदिवस चोख कर्तव्य बजावत असतात. त्याचवेळी हे पोलीस स्वतःच्या घरातील गणेशोत्सवापासून वंचित राहतात. म्हणूनच मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी मुंबई पोलिसांना मनाचा मुजरा म्हणून आरतीचा मान देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील राणी बागचा चिंतामणी, नायगावचा विघ्नहर्ता, ॐ तांडव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, आर्थर रोडचा राजा, ग्रॅन्ट रोडचा राजा, बोरिवलीचा विघ्नहर्ता यासारख्या अनेक मंडळांनी पोलिसांना आरतीचा मान देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारे ‘आरतीचा मान’ या उपक्रमाद्वारे पोलीस या उत्सवात सहभागी होणार आहेत. आजवर मुंबईतील काही मोठ्या मंडळांनी हा उपक्रम राबवला होता, मात्र आता अनेक मंडळांनी या उपक्रमाला सुरुवात केली आहे.

- Advertisement -

गणेशोत्सव काळात पोलीस रात्रंदिवस पहारा देतात. त्यावेळी त्यांना स्वतःच्या घरी साजर्‍या होणार्‍या गणेशोत्सवापासून दूर राहावे लागते. म्हणून राणी बागचा चिंतामणी मंडळाने एका आरतीचा मान मुंबई पोलिसांना देण्याचे ठरविले आहे.
– ओमकार घाग, कार्याध्यक्ष, राणीबागचा चिंतामणी.

यंदाचे हे मंडळाचे ४७ वे वर्ष असून यावर्षी श्रींची मूर्ती इथे राहणार्‍या पोलीस बांधवानी मिळून मंडळाला दिली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणार्‍या पोलिसांचा या उत्सवात सहभाग असावा, याकरिता आम्ही एका आरतीचा मान पोलीस कर्मचार्‍यांना देणार आहोत.
– सुमित निकम, प्रमुख कार्यवाह, नायगावचा विघ्नहर्ता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -