घरमुंबईकपाळावरील चाँद-तारामुळे बोकडाची किंमत १२ लाख !

कपाळावरील चाँद-तारामुळे बोकडाची किंमत १२ लाख !

Subscribe

बोकडाच्या डोक्यावर चाँद-तारा असल्यामुळे त्याला मोठा भाव येत आहे. या बोकडाची किंमत आता १२ ते १४ लाख झाली आहे. मात्र बकरी ईदपर्यंत याची किंमत १६ लाख रुपये होईल, असा विश्वास शेतकर्‍याला वाटत आहे. त्यामुळे तो अजून त्याला विकत नाही. या लखपती बोकडाने कर्जबाजारी शेतकर्‍याला कर्जमुक्त केले आहे.

बकरी ईदच्या दिवशी मुस्लीम बांधव बोकडाची कुर्बानी देतात. तसा मुस्लीम धर्मातील रिवाज आहे. हा रिवाज हिंगोलीतील एका शेतकर्‍याच्या फायद्याचा ठरला आहे. कर्जबाजारी असलेल्या या शेतकर्‍याकडे एक बोकड आहे. त्याच्या कपाळावर चाँद-तारा आहे. मुस्लीम अशा बोकडाला खूप पवित्र मानतात. त्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे त्याची किंमत दिवसागणिक वाढू लागली आहे. एरव्ही ५, १०, १५ हजार रुपयांना बोकड विकला जातो. पण या बोकडाच्या डोक्यावर चाँद-तारा असल्यामुळे त्याला मोठा भाव येत आहे. या बोकडाची किंमत आता १२ ते १४ लाख झाली आहे. मात्र बकरी ईदपर्यंत याची किंमत १६ लाख रुपये होईल, असा विश्वास शेतकर्‍याला वाटत आहे. त्यामुळे तो अजून त्याला विकत नाही. या लखपती बोकडाने कर्जबाजारी शेतकर्‍याला कर्जमुक्त केले आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील येडुत या गावातील अल्पभूधारक शेतकरी श्रीकांत घुगे यांचा हा बोकड आहे. या बोकडामुळे घुगे यांचे नशीब फळफळले आहे. दीड वर्षांपूर्वी घुगे यांनी चार शेळ्या विकत घेतल्या होत्या. कालांतराने त्यांना तीन करडे झाली. त्यातील दोन करडे विकली, पण या करडाच्या डोक्यावर चाँद असल्यामुळे त्यांनी त्याला विकले नाही. घुगे यांचे बोकड नावाप्रमाणेच चाँद आहे. रंगाने काळे असलेल्या बोकडाचे वजन ५३  किलो आहे. याच्या डोक्यावर चाँद आहे, तर दोन शिंगांमध्ये तारा आहे.

- Advertisement -

आतापर्यंत १२ लाख रुपयांपर्यंत बोली

मुस्लीम समाजाचा सण बकरी ईद जवळ आल्यामुळे घुगे हा बोकड विकणार आहेत. या बोकडाच्या डोक्यावर चाँद-तारा आहे हे समजल्यामुळे मुस्लीम बांधव आणि व्यापारी या बोकडाला पाहायला मोठ्या संख्येने रोजच येतात. हे व्यापारी या बोकडाला साडेतीन ते चार लाख रुपयांना मागत आहेत. आतापर्यंत या बोकडाची सात लाख इतकी बोली लागली आहे. आता या बोकडाची बोली बारा ते तेरा लाख इतकी झाली आहे. त्यामुळे १६ लाख रुपयांशिवाय हा बोकड विकणार नाही, असे घुगे यांचे म्हणणे आहे. बोकडाच्या पैशातून घुगे आपल्यावरील कर्ज फेडणार आहेत आणि उरलेल्या पैशातून मुला-मुलींचे शिक्षण आणि लग्न करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -