घरमुंबईमुंबई बँकेची एकदा नाही, हजारदा चौकशी करा, दरेकरांचं खुलं आव्हान

मुंबई बँकेची एकदा नाही, हजारदा चौकशी करा, दरेकरांचं खुलं आव्हान

Subscribe

दरेकरांनी खुलं आव्हान दिलं आहे. मुंबै बँकेची एकदा नाही, हजारदा चौकशी करा, असं म्हणत सरकारला आव्हान दिलं आहे.

मुंबै बँक गैरव्यवहार प्रकरणासंबंधी खोलात जाऊन चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी सहकार विभागाने मुंबै बँकेतील विविध शाखांचे सविस्तर लेखापरीक्षण (ऑडिट) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. यावर दरेकरांनी खुलं आव्हान दिलं आहे. मुंबै बँकेची एकदा नाही, हजारदा चौकशी करा, असं म्हणत सरकारला आव्हान दिलं आहे.

नाबार्डने मुंबै बँकेसंदर्भात दिलेल्या अहवालानंतर सहकार विभागाने सविस्तर ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. या संबंधीचा अहवाल १६ फेब्रुवारीला सुपूर्द करण्यात आला होता. यामध्ये मुंबै बँकेच्या विविध शाखांमध्ये भाडे करार, आधुनिकीकरण, संगणकीकरण आणि फर्निचर खरेदीच्या व्यवहारांमध्ये गंभीर त्रुटी असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे आता या सर्व शाखांचे ऑडिट होईल. त्यामधून आता काय समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावरून राजकीय वर्तुळात यासंदर्भात अडचणी वाढल्या अशा तर्हेतर्हेच्या चर्चा असताना. त्यातच आता प्रवीण दरेकरांनी मुंबै बँकेची एकदा नाही हजारदा चौकशी करा. पण राज्य सहकारी बँकेची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशीचे आव्हान स्वीकारा अशी मागणी केली आहे.

- Advertisement -

मुंबै बँकेचं ऑडिट होणार

मुंबै बँकचा सविस्तर ऑडिट करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. नाबार्डच्या २०१८-१९ च्या अहवालामध्ये बँकेच्या कामकाजावरती ताशेरे ओढण्यात आले आहेत. मुंबै बँकेच्या घोटाळा प्रकरणाची चौकशी सुरु होती. या चौकशीमध्ये काही महत्त्वपूर्ण माहितीचा उलघडा झाला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना डोकेदुखी ठरणार आहे.


हेही वाचा – प्रवीण दरेकर जेव्हा अनिल परबांवर भडकतात 

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -