घरताज्या घडामोडीएमएमआरडीए आयुक्त आर ए राजीव यांना मुदतवाढ

एमएमआरडीए आयुक्त आर ए राजीव यांना मुदतवाढ

Subscribe

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर ए राजीव हे सेवानिवृत्त झाल्यानेच त्यांचा कालावधी २८ फेब्रुवारीला संपुष्टात आला होता. पण एमएमआरडीएवर कंत्राटी तत्वावर नेमणूक करण्याबाबतचा शासन निर्णय घेण्यात आला आहे. आगामी तीन महिन्यांच्या कालावधी करिता त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या ३१ मे २०२१ पर्यंत एमएमआरडीए आय़ुक्त पदावर आर ए राजीव कंत्राटी पदावर कार्यरत राहतील.

R A rajeev

- Advertisement -

एमएमआरडीए प्राधिकरणामार्फत सद्यस्थितीला मेट्रो रेल्वे मार्ग, मुंबई पारबंदर प्रकल्प असे महत्वकांशी प्रकल्प आहेत. तसेच मुंबईत अनेक महत्वकांशी प्रकल्पांची कामे एमएमआरडीएमार्फत सुरू आहेत. एमएमआरडीए हे पद प्रशासकीयदृष्ट्या अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळेच या प्रकल्पाच्या कामांचे सनियंत्रण करणे याची जबाबदारी आर ए राजीव यांच्याकडे राहील. आर ए राजीव यांच्या कामाचा अनुभव पाहता आणि कार्यक्षमतेचा विचार करता प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेले प्रकल्प मार्गी लावण्याकरिता त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा प्राधिकरणाला फायदा होईल ही बाब विचारात घेऊन एमएमआरडीए पदावर कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. महानगर आयुक्तांना सर्व सेवा सवलती आणि भत्ते या कालावधीत देण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -