घरमुंबईमराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करणे आपले कर्तव्य : डॉ सदानंद मोरे

मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करणे आपले कर्तव्य : डॉ सदानंद मोरे

Subscribe

मुंबई महापालिका प्रशासनाद्वारे दरवर्षी २७ फेब्रुवारी ते १३ मार्च यादरम्यान मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्यात येतो. सोमवारी पालिका मुख्यालयात 'मराठी भाषा पंधरवडा शुभारंभ' मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी, उपस्थितांशी संवाद साधताना डॉ. सदानंद मोरे हे बोलत होते.आपण सर्वजण मराठी भाषेचे वारसदार आहोत ही अभिमानाची बाब आहे. मराठीचा झेंडा सातासमुद्रापार फडकला आहेच, आता त्यामध्ये आणखी वृद्धी होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी बोलताना केले.

मुंबईः आपली मातृभाषा मराठी ही समृद्ध भाषा आहे. तिला २ हजार वर्षांचा संपन्न इतिहास लाभला आहे. मराठी भाषा आपले अस्तित्व अधोरेखित करणारी भाषा असल्याने तिचे जतन, संवर्धन करणे हे आपले कर्तव्‍य आहे, असे प्रतिपादन
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी सोमवारी केले.

मुंबई महापालिका प्रशासनाद्वारे दरवर्षी २७ फेब्रुवारी ते १३ मार्च यादरम्यान मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्यात येतो. सोमवारी पालिका मुख्यालयात ‘मराठी भाषा पंधरवडा शुभारंभ’ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी, उपस्थितांशी संवाद साधताना डॉ. सदानंद मोरे हे बोलत होते.आपण सर्वजण मराठी भाषेचे वारसदार आहोत ही अभिमानाची बाब आहे. मराठीचा झेंडा सातासमुद्रापार फडकला आहेच, आता त्यामध्ये आणखी वृद्धी होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी बोलताना केले.

- Advertisement -

सातवाहनकालीन प्रशासकीय मराठी ते आजच्या २१ व्या शतकात वापरात येणाऱ्या मराठी भाषेचा विकास या विषयावर त्यांनी उपस्थितांना उदाहरणांसहित इतिहासातील अनेक दाखले दिले.तसेच मराठी भाषेच्या विकासात संत साहित्याचे महत्व याबाबत त्यांनी संदर्भांसह उपस्थितांना मार्गदर्शन केले. भाषा ही संस्‍कृतीचा आधार आहे. मराठी भाषा ही संतांनी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारख्या महापुरुषांनी व्यवहारात आणलेली भाषा आहे. मराठी भाषेत आपल्या अस्तित्वाचा सुगंध आहे. हे अस्तित्व जपण्यासाठी व त्याद्वारे आपल्या अस्मितेची जाणीव करून देण्यासाठी मराठी भाषा पंधरवडा राबविणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहआयुक्त मिलिन सावंत यांनी केले. यावेळी त्यांनी मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्याबाबतची ऐतिहासिक पार्श्वभूमी विषद केली. तसेच, पालिका प्रशासनात राबविले जात असलेल्या मराठी भाषा विषयक उपक्रमांची माहितीही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली.
या कार्यक्रमाच्या दरम्यान दुरदृश्य प्रणालीद्वारे विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथील पुस्तक विक्री दालनाचा शुभारंभ मा. अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा यांच्या, तर बोरिवली(पश्चिम) परिसरातील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह येथील पुस्तक विक्री दालनाचा शुभारंभ डॉ. सदानंद मोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

- Advertisement -

कार्यक्रमाच्या सुरुवातील महापालिका संगीत – कला अकादमीच्या चमुने मराठी गौरव गीते सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महापालिकेच्या शिक्षण खात्याचे सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी रवींद्र काळे यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -