घरमुंबईसहलींसाठी खासगी गाड्या

सहलींसाठी खासगी गाड्या

Subscribe

पालिकेला लाखोंचा फटका

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे यंदा पहिल्यांदाच मुंबईच्या बाहेर शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईच्या बाहेर एका वॉटर रिसोर्टवर ही सहल आयोजित केल्याने प्रशासनावर टीका होत असताना आता ही सहल नव्या वादात सापडली आहे. रिसोर्टवर सहलींचे आयोजन करताना प्रशानाने विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी खासगी बसेसची निवड केली आहे. या अगोदर पालिकेच्या शिक्षण विभागाच्या सहलींसाठी बेस्ट प्रशासनाच्या बसेसची निवड केली जात होती. मात्र यंदा खासगी बसेसची निवड केल्याने बेस्ट प्रशासनाला लाखो रुपयांचा फटका आहे.

या सहलींच्या माध्यमातून बेस्ट प्रशासनाला मिळणारी रक्कम यंदा बंद झाली आहे. बेस्टच्या तोट्यात आणखीन वाढ होण्याची शक्यता बेस्टमधीलच अधिकार्‍यांकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाची ही सहल नव्या वादात अडकण्याची शक्यता असून या सहलींना अनेक सदस्यांनीच विरोध केला असल्याची माहिती पुढे आली आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे दरवर्षी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यात येते. या सहलींसाठी मुंबई आणि आसपासच्या ठिकाणांची निवड केली जात होती. ही सहल आयोजित करताना विद्यार्थ्यांची ने आण करण्यासाठी बेस्ट प्रशासनाच्या बसेसची निवड केली जात होती. यासाठी बेस्ट प्रशासनाला रितसर येणारे शुल्क देखील भरले जात होते. त्यामुळे या सहलींच्या माध्यमातून बेस्ट प्रशासनाला मोठ्या प्रमाणात निधी मिळत होता. यंदा मात्र पालिकेच्या शिक्षण विभागाने मुंबईच्या बाहेर सहलींचे आयोजन करताना विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी खासगी बसेसची व्यवस्था केली आहे. त्यामुळे बेस्टला यंदा या सहलींतून मिळणारे उत्पन्न मिळणार नाही. त्यामुळे लाखो रुपयांचा निधीस मुकावे लागणार आहे.

मुळात एकीकडे बेस्ट प्रशासनाची आर्थिक बाजू सुस्थितीत नसताना शिक्षण विभागाने घेतलेला निर्णय वादात अडकला आहे. तर त्याचबरोबर सहलींसाठी निश्चित करण्यात आलेले ठिकाण देखील चर्चेचा विषय ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या सहली या रिसोर्ट, समुद्र किनारे अशा ठिकाणी नेऊ नये, अशी स्पष्ट ताकीद राज्य शिक्षण विभागाने दिलेले आहेत. मात्र त्यानंतरही जाणीवपूर्वक याकडे कानाडोळा करण्यात आल्याने ही वेळ आल्याची टीका यावेळी शिक्षण समितीती सदस्यांकडून करण्यात आला आहे. तर याप्रश्नी आगामी बेस्ट समितीच्या बेठकीत देखील चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

याबद्दल बोलताना शिक्षण समितीच्या एका सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, मुळात बेस्ट प्रशासन हा पालिकेचाच एक भाग आहे. याचा विसर शिक्षण विभागाला पडल्याचे दिसते. बेस्टला होणार्‍या तोट्यातून बाहेर काढण्यासाठी प्रशासन अनेक प्रयोग राबवित आहेत. दरवर्षी सहलींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रक्कम बेस्ट प्रशासनाला मिळते. पण यंदा मुंबईच्या बाहेर या सहलींचे आयोजन केल्याने विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी खासगी बसेस वापरल्या जाणार आहेत. त्यामुळे या निर्णयाविरोधात पुनर्विचार होणार गरजेचे आहे किंवा सहल मुंबई बाहेर जात असली तरी बेस्ट प्रशासनाच्या बसेसचा वापर करण्यासाठी त्यास परवानगी दिल्यास नक्कीच त्याचा फायदा प्रशासनास होईल, याची दखल घेणे गरजेेचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -