घरमुंबईमहागडे मोबाईल चोरीकरणाऱ्या दोन महिला जेरबंद

महागडे मोबाईल चोरीकरणाऱ्या दोन महिला जेरबंद

Subscribe

रेल्वे प्रवासादरम्यान लोकांचे महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोन महिलांना रेल्वे पोलिसांनी नुकतेच अटक केले आहे. या महिलांकडून पोलिसांनी तीन लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून महिलांना चोरी करताना रंगेहाथ पकडले. दरम्यान या सराईत चोरांना अटक करण्यात आली असून न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना ८ जून पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक राहुल कारभारी यांनी दिली.

बॉयफ्रेंडसाठी चोरायच्या मोबाईल

ट्विंकल जयराज सोनी आणि टिनल जयंतीलाल परमार असे या महिलांची नावे आहेत. उपनगरांमध्ये रेल्वे प्रवाशी बनून लोकांचे महागडे मोबाईल लंपास करण्यात या दोघी सराईत होत्या. पोलिसांनी यादोघींवर लक्ष ठेवून त्यांना कांदिवली रेल्वे फलाटावर रंगेहाथ चोरी करताना पकडले. प्रवाशांकडून मोबाईल लंपास करुन या दोघी पळ काढत असतांना त्यांना पोलिसांनी पकडले. त्यांच्या जवळ महागडा मोबाईल पाहून त्यांना त्या बाबत विचारणी केली असता त्यांनी मोबाईल चोरी केला असल्याची कबूली दिली. तसेच चोरीचे मोबाईल त्यांनी चंपक उर्फ राहुल टगाजी राजपुरोहित याला विकले असल्याचे सांगितले. राहुलकडून वेगवेगळ्या कंपनीचे १९ चोरीचे मोबाईल ताब्यात घेतले आहे. अटक केल्यानंतर या पूर्वीही १६ गुन्हे नोंदविले गेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -