घरमुंबईठाण्यात अवघ्या 1 हजार 346 इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प

ठाण्यात अवघ्या 1 हजार 346 इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प

Subscribe

इंजिनिअर्सच्या कमतरतेचा फटका

ठाण्यात गेल्या 7 वर्षांत 1 हजार 346 इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प साकारण्यात आला आहे. मात्र, या यंत्रणेची काय स्थिती आहे. याबाबतची कोणतीच माहिती पालिकेकडे नाही. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या ठाण्याला अवघे 20 अभियंते आहेत, त्यामुळे अपुर्‍या अभियंत्यांचा फटका रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प यंत्रणा तपासणीला बसत आहे.

राज्य शासनाने प्रत्येक इमारतीवर रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविणे सक्तीचे केले आहे. भविष्यातील पाणीटंचाईची समस्या लक्षात घेता पावसाळ्यातील पाण्याचे नियोजन करणे बंधनकारक आहे. 2007-08 पासूनच कायदा करण्यात आला असला तरी सुद्धा ठाण्यात 2012-13 पासूनच याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. सुमारे 300 स्के. फूट प्लॉटला हा प्रकल्प राबविणे बंधनकारक आहे. नवीन इमारत पूर्ण झाल्यानंतर त्या इमारतीला ओ.सी. प्रमाणपत्र देण्याअगोदर रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविण्यात आला आहे की नाही याची पालिकेच्या पाणीपुरवठा अभियंत्यांकडून तपासणी केली जाते. त्यानंतरच इमारतीला ओसी दिली जाते. ठाण्यात आतापर्यंत 1346 इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प असल्याची माहिती पालिकेच्या एका अधिकार्‍याने दिली. एकदा ही यंत्रणा इमारतीत बसविल्यानंतर त्या इमारतीतील रहिवाशांनी देखभाल दुरुस्ती करावयाची आहे.

- Advertisement -

मात्र आतापर्यंत लावण्यात आलेली यंत्रणा किती यंत्रणा सुस्थितीत आहेत. बंद आहेत याची माहिती पालिकेकडे नाही. कारण महापालिकेकडून एकदा तपासणी केल्यानंतर पुन्हा तपासणी केली जात नाही. पालिकेकडे एकूण 20 अभियंते आहेत. मात्र, पालिकेतील पाणीपुरवठ्याची दैनंदिन कामे असतात, त्यामुळे ही यंत्रणा तपासणीसाठी अभियंते अपुरे असल्याचे एका अधिकार्‍याने आपलं महानगरशी बोलताना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -