घरमुंबईआघाडीने वापरुन घ्यावं इतका मी वेडा नाही - राज ठाकरे

आघाडीने वापरुन घ्यावं इतका मी वेडा नाही – राज ठाकरे

Subscribe

'देशावरती नरेंद्र मोदी आणि अमित शहा नावाचे दोन मोठी संकट उभी राहिली आहेत. या संकटाला दूर करण्यासाठी मी त्यांच्याविरोधात प्रचार करणार', असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने येणाऱ्या वर्षात मोदीमुक्त भारत व्हावा, अशा शुभेच्छा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्या आहेत. शनिवारी शिवाजी पार्क येथे मनसेचे गुढीपाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे देशावर आलेले संकट आहे. त्यामुळे या संकटाला दूर करण्यासाठी आपण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार करणार, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. ‘या प्रचाराचा फायदा आघाडीला होत असेल तर होऊ दे. आघाडीने मला वापरुन घ्यावं इतकाह मी वेडा नाही’, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

‘आघाडीने वापरुन घ्यावं इतका मी वेडा नाही’

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीने मला वापरुन घ्यावं इतका मी वेडा नाही, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी मोदी सरकारच्या विरोधात प्रचार सभा घेणार. या प्रचाराचा फायदा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला झाला तर होऊ दे. मात्र, मी भाजप विरोधात प्रचार करणार. यासोबतच लोक म्हणतात की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी राज ठाकरेंचा वापर करुन घेत आहेत. परंतु, आघाडीने मला वापरुन घ्यावे, इतका मी वेडा नाही, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -