घरमुंबईमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ट्रेन १५ ते २० मिनिटे उशीरा

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ट्रेन १५ ते २० मिनिटे उशीरा

Subscribe

आठवड्यातला पहिलाच दिवस आणि ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची गर्दी असतानाच हा सगळा प्रकार घडला.त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांची गर्दी झाली.

कल्याण ठाकुर्ली दरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडाचा फटका मध्य रेल्वेला बसला आहे. सकाळी १०.३० च्या सुमारास कल्याण- ठाकुर्ली स्थानकादरम्यान हा बिघाड झाला. त्यानंतर ही  वाहतूक तब्बल तासाभरासाठी खोळंबली. पण अजूनही मध्य रेल्वे सुरळीत नाही. मुंबई सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल या तब्बल ३० ते ३५ मिनिटे उशीरा आहेत. तर कल्याणकडे जाणाऱ्या गाड्यांचेही वेळापत्रक कोलमडले आहे. या गाडया तब्बल २५ ते ३० मिनिटे उशीरा धावत आहेत.

ऐन गर्दीच्यावेळी झाला गोंधळ

सकाळी १० वाजून ३५ मिनिटांच्या दरम्यान ही घटना घडली.अचानक झालेल्या बिघाडामुळे लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक तासाभरासाठी बंद झाली. आठवड्याचा पहिला दिवस असल्यामुळे ऑफिसला जाणाऱ्यांची सकाळी गर्दी होती. त्यामुळे काही काळ या ठिकाणी प्रवाशांची त्रेधातिरपिट उडाली. सकाळी फॅस्ट ट्रकवरील गाड्या स्लो ट्रॅकवर वळवण्यात आल्या होत्या.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -