घरलाईफस्टाईलडार्क चॉकलेट खा आणि हेल्दी राहा!

डार्क चॉकलेट खा आणि हेल्दी राहा!

Subscribe

चॉकलेट जास्त खाल्ल्याने दात किडतात, असे आपण लहान मुलांना सतत सांगत असतो. मात्र डार्क चॉकलेट खाण्याचे अनेक लाभदायी फायदे देखील आहेत. चॉकलेट केवळ आवडी पुरतेच मर्यादित नसून आरोग्यासाठीही उपयुक्त ठरते.

चॉकलेट म्हटलं की लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणाच्या ही तोंडाला पाणी सुटते. काही व्यक्तींना चॉकलेट खाण्याची दररोजची सवय देखील असते. मात्र, चॉकलेट खाल्ल्याने दात खराब होणं, पोटात दुखणं अशा समस्या निर्माण होतात. याकरता काही व्यक्ती चॉकलेट खाणं टाळतात. परंतु चॉकलेट खाण्याचे काही आश्चर्यचकित करणारे फायदेही आहेत.

depressedडार्क चॉकलेट खाल्ल्याने तणाव कमी होण्यास मदत होते. चॉकलेटमध्ये वापरण्यात येणाऱ्या कोको पावडरमध्ये अँटिऑक्सिडंटस् असते. ते शरिराचे स्वास्थ चांगले राखण्यासाठी मदत करते. त्यामुळे डार्क चॉकलेट खाल्ल्याने तणाव कमी होण्यास मदत होते.

- Advertisement -

weight-lossवैज्ञानिकांच्या संशोधनानुसार दररोज डार्क चॉकलेटचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. त्याचप्रमाणे चॉकलेटमधील कोको फ्लॅवनॉल वाढत्या वयासंबंधित आजारांना दूर ठेवतात. अमेरिकेच्या संशोधनानुसार, दररोज हॉट चॉकलेटचे दोन कप सेवन केल्याने मानसिक स्वास्थ चांगले राहते आणि स्मरणशक्तीही देखील वाढते.

bloodpressureज्या व्यक्तींना अचानक ब्लड प्रेशर कमी होण्याचा त्रास आहे अशा व्यक्तींनी नेहमी आपल्या सोबत चॉकलेट ठेवणे गरजेचे असते. ब्लड प्रेशर कमी झाल्यास त्यावेळी लगेचच चॉकलेट खाल्ल्यास ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेण्यास मदत होते.

- Advertisement -

heart-attackदररोज चॉकलेट खाल्ल्याने शरिरातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी मदत होते. त्यामुळे नेहमी चॉकलेट खाणे फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे चॉकलेटच्या सेवनाने हृदयरोगाची शक्यता कमी होते.

fatigueथकवा आलेल्या व्यक्तीने डार्क चॉकलेटचे सेवन केल्यास थकवा दूर होण्यास मदत होते. डार्क चॉकलेटमध्ये असणाऱ्या कोकोच्या सेवनाने थकवा कमी होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -