घरमुंबईRam Mandir : शंकराचार्यांवरील 'त्या' वक्तव्यानंतर नारायण राणे यांचे अवघ्या तासाभरात घुमजाव;...

Ram Mandir : शंकराचार्यांवरील ‘त्या’ वक्तव्यानंतर नारायण राणे यांचे अवघ्या तासाभरात घुमजाव; म्हणाले…

Subscribe

मुंबई : 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन सोहळा होणार आहे. या सोहळ्याची संपूर्ण देशाला प्रतीक्षा आहे. एकीकडे सर्वत्र उत्साहाचं वातावरण सुरू असतानाच दुसरीकडे राम मंदिराबाबत वाद सुरू आहेच. काहींनी या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. यात शंकराचार्यांचाही समावेश झाला आहे. शंकराचार्यांनी राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला जाणार नसल्याचं म्हटले होते. शंकराचार्यांच्या वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांना थेट आव्हान करताना म्हटले होते की, राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार घालणाऱ्या शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी काय केलं? असा सवाल उपस्थित केला होता. मात्र अवघ्या तासाभरात त्यांनी आपल्या वक्तव्यावर घुमजाव केले आहे. आपण असं बोललोच नाही, पत्रकारांनी वेगळाच अर्थ काढल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (Ram Mandir After statement on Shankaracharya Narayan Rane take uturn within an hour)

हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : निमंत्रण मिळाले नसले तरी अयोध्येला नक्की जाणार, पण…; शरद पवारांचे मोठे भाष्य

- Advertisement -

शंकराचार्यांनी होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात की त्यांनी त्यावर टीका करावी? असा सवाल करत नारायण म्हणाले होते की, शंकराचार्य भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकीय दृष्टीकोनातून पाहत आहेत. हे मंदिर राजकीय दृष्टीकोनातून होत नाही, तर धार्मिकतेने होत आहे. राम आमचं दैवत आहे. त्यासाठीच हे सगळं होत आहे आणि केलं जात आहे. शंकराचार्यांनी त्यांच्या आयुष्यातील हिंदू धर्मासाठी असलेले योगदान सांगावे? रामांनी हिंदू धर्माला जे योगदान दिलं तसं शंकराचार्यांना सांगावे? असे सवाल नारायण राणे उपस्थित केले होते. त्यांच्या वक्तव्यावरून होत असल्याचे लक्षात आळ्यानंतर त्यांनी आता घुमजाव करत स्पष्टीकरण दिले आहे.

भाजपच्या एका कार्यक्रमात बोलताना नारायण राणे म्हणाले की, पत्रकारांशी माझ्याशी बोलताना विचारले की चार साधू असं म्हणाले, त्यावर मी म्हटलं त्यांनी मोदींवर टीका केली. पण जे कोणी केलं नाही ते मोदींनी केलं ना? राम मंदिर बांधलं. आतापर्यंत कोणीही बांधलं नाही. ते अपुरं आहे, पण होईल योग्यवेळी. तोपर्यंत रामाची तर साधना होईल ना? मग त्यावरून टीका करू नका, असं मी बोललो. पण पत्रकारांनी लावलं की ते असे बोलले, तसे बोलले आणि आता यावरून वाद होत आहे. पण नारायण राणे वादाला कधीच घाबरत नाही. मी तुम्हाला सांगतो की, मी एवढी वर्षे राजकारणात आहे. 50 वर्षांहून अधिक काळापासून, वादातूनचं मी इथवर पोहोचलो आहे, असे स्पष्टीकरण नारायण राणे यांनी दिले.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Politics : सात जन्मात उद्धव ठाकरे फडणवीसांची बरोबरी करू शकत नाही; बावनकुळेंचे प्रत्युत्तर

शंकराचार्य काय म्हणाले?

स्वामी निश्चलानंद म्हणजे शंकराचार्य म्हणाले की, जर कोणी या सिंहासनाशी खेळण्याचा प्रयत्न केला, तो कितीही मजबूत असला तरी तो सुरक्षित राहू शकणार नाही. मी जनतेला भडकावत नाही, पण जनता आमचा शब्द पाळते. जनमत आमच्या पाठीशी आहे. धर्मग्रंथांचे मतही आमच्या पाठीशी आहे. ऋषींचे मतही आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे आम्ही सर्व बाबतीत बलवान आहोत आणि कोणीही आम्हाला दुर्बल समजू नये. खऱ्या-खोट्या शंकराचार्यांच्या प्रश्नावर ते म्हणाले की, पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, राज्यपाल हे खोटे नसतात. मग शंकराचार्यांनी पदे यापेक्षा वाईट आहेत का? ते पुढे म्हणाले की, सत्ताधाऱ्यांवर सत्ता गाजवण्याचे पद आमचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -