घरमुंबईशिवसेनेने उपमुख्यमंत्रीपद स्विकारून सत्तेत सामील व्हावे - आठवले

शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपद स्विकारून सत्तेत सामील व्हावे – आठवले

Subscribe

शिवसेनेने आपला हट्ट सोडून उपमुख्यमंत्रीपदासह सत्तेत सामील व्हावे, असे ट्विट करुन रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली.

आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत राज्यात महायुतीने सत्ता स्थापन करावी, असे म्हटले. तसेच जनतेने आम्हाला विरोधात बसण्यास सांगितल्याने आम्ही विरोधात बसणार, असेही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. शरद पवार यांच्या या भूमिकेचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्वागत केले आहे. शिवसेनेने आपला हट्ट सोडून उपमुख्यमंत्रीपदासह सत्तेत सामील व्हावे, असे ट्विट करुन रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले रामदास आठवले?

शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, “राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या विरोधात बसण्याच्या विधानाचे मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल. त्यामुळे शिवसेनेनेसुद्धा हट्ट सोडून उपमुख्यमंत्रीपद घेत सरकारमध्ये सामील व्हावे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -